• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ओप्पो रेनो 16 आणि रेनो 16c ची विक्री सुरू, 6 हजार 199 रुपयांची घसघशीत सूट

July 12, 2026 by admin Leave a Comment


ओप्पो रेनो 16 सिरीज विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे, ज्यामध्ये रेनो 16 आणि रेनो 16c यांचा समावेश आहे. दोन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, AMOLED डिस्प्ले आणि 80W वायर्ड फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. रेनो 16 ची किंमत 62 हजार ते 68 हजाराच्या दरम्यान आहे, तर रेनो 16c ची किंमत 47 हजार ते 56 हजाराच्या दरम्यान आहे. तसेच तुम्ही हा फोन खरेदी कराल तेव्हा तुम्हाला यावर 6 हजार 199 रूपयांची त्वरित सूट मिळणार आहे. चला तर मग ऑफरनंतर हा फोन तुम्हाला कोणत्या किंमतीत खरेदी करता येईल ते जाणून घेऊयात.

ओप्पो रेनो 16 ची किंमत

ओप्पो रेनो 16 या फोनच्या 8GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 61 हजार 999 रूपये आहे, तर 12GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटची किंमत 67 हजार 999 रूपये आहे. तसेच तुम्ही हा फोन खरेदी करताना HDFC, ICICI, SBI आणि Axis Bank कार्ड वापरून पेमेंट केल्यास 6 हजार 199 रूपयांची सूट मिळेल.

तसेच हा फ्लॅगशिप फोन IQOO 15 5G, Samsung Galaxy S25 5G, Google Pixel 10 आणि Samsung Galaxy S25 Edge 5G सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करतो.

ओप्पो रेनो 16c ची किंमत

या ओप्पो स्मार्टफोनच्या 8GB रॅम + 128GB व्हेरिएंटची किंमत 46 हजार 999 रूपये आहे तर 8GB रॅम + 256GB व्हेरिएंटची किंमत 49 हजार 999 रूपये आणि 12GB रॅम + 256GB व्हेरिएंटची किंमत 55 हजार 999 रूपये इतकी आहे. SBI, HDFC, Axis आणि ICICI बँक कार्ड वापरून पेमेंट केल्यास या फोनवर तुम्हाला 4 हजार 699 रूपयांची सूट मिळेल.

ओप्पो रेनो 16c स्मार्टफोनची माहिती

या फोनमध्ये 6.57-इंचाचा AMOLED स्क्रीन असून त्याची कमाल ब्राइटनेस 1400 nits पर्यंत आहे आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे.

तसेच यात ऑक्टा-कोअर मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर आहे. यात OIS सह 50MP सोनी LYT-600 सेन्सर, 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50-मेगापिक्सलचा टेलीफोटो सेन्सर आहे. 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देखील उपलब्ध आहे.

ओप्पो रेनो १६ चे फिचर्स

या ओप्पो फोनमध्ये 3500 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेली 6.32-इंचाची AMOLED स्क्रीन आहे. वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, हा फोन ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 7th Gen 4 प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये OIS सह 50MP प्रायमरी सोनी LYT-600 सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आणि 50MP टेलीफोटो कॅमेरा यांचा समावेश आहे. सेल्फीसाठी 50MP फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. यात 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6700mAh बॅटरी आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in