• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एसीरुम या वस्तू ठेवण्याची कधीही चूक करु नका, एकदा कारण नक्की घ्या जाणून

September 2, 2026 by admin Leave a Comment


सांगायचं झालं तर, आता फक्त ऑफिसमध्येच नाही तर, अनेकांच्या घरी देखील एसी असतोच. वातावरण पाहता अनेक जण एसीचा वापर करता. कडक उन्हापासून किंवा उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी एअर कंडिशनर वापरतो. उन्हाळ्यात आपलं घर थंड आणि आरामदायक ठेवण्यासाठी एसी खूप मदत करतो. पण, बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की एसी असलेल्या खोलीतील थंड, कोरडी हवा अनेक घरगुती उपकरणांचं नुकसान करू शकतं. एसी केवळ खोली थंडच करत नाही, तर हवेतील ओलावा शोषून घेतो, ज्यामुळे हवा कोरडी होते. अशा कोरड्या, थंड वातावरणात काही वस्तू जास्त काळ ठेवल्यास त्या लवकर खराब होऊ शकतात.

काही प्रकारची झाडे: अनेक लोक आपले घर सुंदर दिसावं म्हणून एसी असलेल्या खोल्यांमध्ये घरातील रोपे ठेवतात. मात्र, एसीच्या सततच्या वाऱ्यामुळे रोपांच्या पानांमधील ओलावा नाहीसा होतो, ज्यामुळे पाने सुकतात आणि गळून पडतात. ज्या रोपांना जास्त आर्द्रतेची आवश्यकता असते, त्यांना थेट एसीखाली ठेवू नये.  झाडांना ऊन देखील लागतं. त्यामुळे एसीच्या रुममध्ये झाडे ठेवू नका.

लाकडी वस्तू आणि संगीत वाद्ये: चांगल्या प्रतीच्या लाकडाचे फर्निचर, चित्रे, गिटार आणि व्हायोलिनसारखी संगीत वाद्ये एसीच्या कोरड्या हवेमुळे खराब होतात. आर्द्रता कमी झाल्यामुळे लाकडाला तडे जाऊ शकतात किंवा ते वाकडे होऊ शकते.

सौंदर्य प्रसाधने, त्वचेची काळजी घेणारी उत्पादने: मॉइश्चरायझर, क्रीम, लिपस्टिक आणि इसेन्शियल ऑइल यांसारखी उत्पादने एसी असलेल्या खोलीत जास्त काळ ठेवल्यास, त्यांतील तेलाचे प्रमाण बदलते आणि ती फाटू शकतात किंवा कडक होऊ शकतात.

उघडलेले खाद्यपदार्थ आणि फळे: एसी असलेल्या खोलीतील कोरडी हवा अन्नपदार्थांमधील नैसर्गिक ओलावा पटकन शोषून घेते. एसीच्या हवेत फळे, भाज्या आणि ताजी फुले लवकर कोमेजतात.

सुगंध आणि मसाले: एसीमुळे खोलीतील तापमानात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे परफ्यूममधील सुगंधित घटकांचे विघटन होऊ शकते, ज्यामुळे त्यांचा सुगंध कमी होतो.

लक्षातल ठेवण्यासारखी सर्वात महत्त्वाची  गोष्ट म्हणजे, एसीच्या हवेत वस्तू थेट ठेवू नका. झाडांना किंवा वस्तूंना नियमितपणे पुरेशी हवा आणि प्रकाश मिळेल याची खात्री करा. एसी असलेल्या खोलीत ह्युमिडिफायर वापरल्याने हवेतील आर्द्रतेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होऊ शकते.

 

 



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बाबा वेंगांच्या भविष्यवाणीने खळबळ! भूकंप, महापूर आणि महायुद्ध, सप्टेंबरनंतर जगात हाहाकार?
  • Uddhav Thackeray vs Eknath Shinde : भाजपसोबत गद्दारी, काँग्रेससोबत युती… शिंदेंच्या वकिलाचा जोरदार युक्तिवाद; काय म्हटलं नेमकं?
  • शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?
  • टी20 सामन्यात ट्वीस्ट! शेवटचा चेंडू आणि 4 धावांची गरज; दुसरी धाव घेताच गडबड, पंचांनी दिला असा निर्णय
  • मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का, न्यायालयातून मोठी बातमी, कोर्टाकडून महत्त्वाचा निर्णय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in