• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एसटी स्थानकात प्रवाशाला हार्ट अटॅक, कंडक्टरने CPR दिल्याने वाचले प्राण

August 3, 2026 by admin Leave a Comment


छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकात एका महिला प्रवाशाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याचा बाका प्रसंग घडला. मात्र, महिला एसटी वाहकाने प्रसंगावधान दाखवत या प्रवाशाला सीपीआर दिल्याने त्याचे श्वास पुन्हा सुरु झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात वेळीच पावले उचलून महिला प्रवाशाला वाचवणाऱ्या महिला कंडक्टरचे कौतूक होत आहे.

राजस्थानहून मालेगावकडे जाणाऱ्या या महिला प्रवासी अचानक बेशुद्ध पडल्या. त्यावेळी उपस्थित असलेल्या एसटी महामंडळाच्या वाहक संगीता पालवे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ महिलेला फरशीवर झोपवून सीपीआर दिला. काही क्षणांतच महिलेचा श्वास पुन्हा सुरू झाला आणि त्यांची प्रकृती स्थिर झाली.

या वेळी बसस्थानकातील सुरक्षारक्षक कविता भुतेकर यांनीही मदत केली. रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने अन्य वाहनातून महिलेला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, संगीता पालवे यांनी यापूर्वी नर्सिंगचे शिक्षण घेतले असून त्यांना सीपीआरचे प्रशिक्षण असल्याने त्यांनी योग्य वेळी योग्य उपचार देत महिलेचे प्राण वाचवले. “मी माझे कर्तव्य पार पाडले. मी घेतलेले नर्सिंगचे शिक्षण आज एका महिलेचे प्राण वाचवण्यासाठी उपयोगी पडले, याचा मला आनंद आहे,” अशी भावना संगीता पालवे यांनी व्यक्त केली. या धाडसी आणि तत्पर कृतीबद्दल संगीता पालवे यांचे वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.

संगिता पालवे यांनी नर्सिंग केलेले आहे. त्यांना आवड होती म्हणून त्या नर्सिंग सोडून इकडे आल्या, त्यांना पोलीस सेवेची आवड होती, मात्र, पोलीसमध्ये नोकरी मिळाली नाही म्हणून मी एसटी महामंडळामध्ये आले. मला खूप आनंद आहे की एका महिलेचे प्राण वाचले आणि मी जे शिक्षण घेतलं ते आज कामी आले आहे असे महिला कंडक्टर संगिता पालवे यांनी म्हटले आहे.

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in