• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एसआयटी रात्रभर घरी; मुलाची 4 तास चौकशी, खासदार बजरंग सोनवणे भावुक, म्हणाले सौरवने बालपणापासून…

June 27, 2026 by admin Leave a Comment


बिड जिल्ह्यातल्या केजमध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, दोन गटातील भांडणं मिटवण्यासाठी गेलेल्या तरुणावरच धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला, या हल्ल्यात विलास घुले या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विलास घुलेच्या हत्येमुळे राज्यात आता वातावरण चांगलंच तापलं आहे.  या प्रकरणात बिडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर देखील आरोप करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता एसआयटीकडून बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरव सोनवणे यांची चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर बजरंग सोनवणे चांगलेच भावुक झाल्याचे पहायला मिळाले.

नेमकं काय म्हणाले सोनवणे? 

‘ सत्य परेशान हो सकता  है लेकीन पराजित नही, आम्ही चौकशीत पूर्णपणे सहकार्य करणार आहोत. एसआयटी रात्रभर माझ्या घरी होती. माझ्या कुटुंबाला यातून जावं लागतंय, पण हा चौकशीचा भाग आहे. हा नियम आता जिल्ह्यात लागु झाला आहे. इतर पुढाऱ्यांच्या घरी असंच घडलं तर वाईट वाटु नये. कारण आता सुरुवात झाली आहे. कमी वयामध्ये माझ्या मुलाला चार तास एसआयटीसमोर जबाब द्यावा लागला.  मी वडील म्हणून कमी पडलो पण लोकप्रतिनिधी म्हणून तपासासाठी सहकार्य करणं हे माझं कर्तव्य आहे. दररोज वेगळा आरोप होत आहे. कधी गाडी दिली असं म्हणतात, कधी तो गाडीत होता म्हणतात, कधी गाडीतून आरोपी गेले म्हणतात. या प्रकरणात कुठलाही एक स्टॅण्ड नाही, असं यावेळी सोनवणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  बालपणापासून सौरवने कधी रागाने सुध्दा बघीतलेलं नाही. रात्री फॉरेन्सिक टीम, एसआयटी टीम सगळे आलो होते.  माझ्या घरातील लग्न आहे,  पण आम्ही आज गेलो नाहीत.
या प्रकरणाच्या मुळाशी गेलं पाहिजे. हे प्रकरण वेगळ्या वळणावर नेण्याचं काम केलंय.  माता भगिनींवर जर अन्याय करत असाल तर खासदार म्हणून मी सहन करणार नाही. सीआयडीकडून याचा तपास करा अशी माझी मागणी आहे, असं यावेळी खासदार सोनवणे यांनी म्हटलं आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • TET पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM ना करणार मागणी
  • अखेर तो दिवस आलाच, भारताच्या सर्वात मोठ्या शत्रूचा खात्मा, पाकिस्तानात मोठी खळबळ
  • अचानक बिकिनी परिधान करण्याची मागणी, अभिनेत्रीने दिला नकार, 2 तास बंद पडलेलं सर्व शूटिंग
  • FIFA World Cup: केप वर्डे संघाने रचला इतिहास, बाद फेरीत पोहोचताच नोंदवला असा विक्रम
  • Ketan Agarwal Case: मोठी अपडेट! सियाने दिली कबुली, कुटुंबाला अफेअरबाबत सांगण्यापेक्षा…पोलीसही हादरले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in