
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जातप्रमाणपत्र रद्द केल्यावरुन टीका करणे सुरु केले असून येत्या २९ ऑगस्ट रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या प्रकरणात एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना टार्गेट करणे योग्य नाही. बावनकुळे यांनी जाणीवपूर्वक वा कोणत्याही उद्देश्याने प्रमाणपत्र रद्द केलेले नाही असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची पाठराखण केली आहे.त्यावर मनोज जरांगे यांनी चंद्रशेखर बावणकुळे यांची बाजू घेणे हा मराठ्यांना विरोध असल्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मराठा नेते मनोज जरांगे यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्यावरुन त्यांच्यावर जोरदार टीका सुरु केली आहे. आता या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाणीवपूर्वक प्रमाणपत्र रद्द केलेले नाही.एखादा मंत्री ओबीसी म्हणून त्यांना असे टार्गेट करणे योग्य नाही असेही म्हटले आहे. या संदर्भात मनोज जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगले काम केले होते तेव्हा आम्ही त्यांचे कौतूक केले होते. आता तुम्ही त्यांची बाजू घेणार असाल तर ही मराठ्यांना धमकी आहे. तुमचे नियत तुमच्यासंगत, आमची जात कशी वाचवायची ते मी ठरवतो असे उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
मनोज जरांगे यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचे काम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे मंत्री करत असल्याचा आरोप करत येत्या २९ ऑगस्ट पासून पुन्हा आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. या प्रकरणात मनोज जरांगे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे. या संदर्भात सरकारने मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे.
Leave a Reply