• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एक तर स्मशानात किंवा हॉस्पिटलमध्ये जाल, मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स काढून ठेवा, खासदार संजय दिना पाटील यांचा थेट इशारा..

June 23, 2026 by admin Leave a Comment


मुंबई ईशान्यचे खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत 5 खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने राज्यभरात बंडखोरी खासदारांविरोधात ऑपरेशन तुडवा जाहीर केले. आता ठाकरे गटातून बंडखोरी केलेल्या खासदारांनी ऑपरेशन तुडवा विरोधात थेट भूमिका घेतली. नागेश आष्टीकर, संजय जाधव यांच्यानंतर थेट खासदार संजय दिना पाटील यांनीही यावरून जोरदार निशाना साधला. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर संजय दिना पाटील थेट ऑपरेशन तुडवाबद्दल बोलताना दिसले. संजय दिना पाटील यांनी कालच ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत म्हटले की, मी किंवा माझी मुलगी तुमच्याकडे तिकिट मागण्यासाठी आलो नव्हतो.

माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबाकडे वाईट नजरेने बघितले ना तर एक तर स्मशानात जाल किंवा थेट हॉस्पिटलमध्ये. त्याकरिता अगोदर मेडिक्लेम आणि लाईफ इन्शुरन्स  तुमची काढून ठेवा. संजय दिना पाटील यांनी म्हटले की, मला पोलिस संरक्षण नको हीच माझी विनंती आहे. कारण माझ्यासोबत पोलिस असताना मी त्यांना कसा मारू ना.. कारण पोलिस मला त्यांना मारू देणार नाहीत.

पोलिस माझ्यासोबत नसावेत, त्यावेळी त्यांनी माझ्यावर हल्ला करायला यावे… म्हणजे मी पण त्यांना मारेल ना.. मुळात म्हणजे मला त्यांच्यापासून कुठलीच भीती नाही.. उलट त्यांना माझ्यापासून भीती आहे. थेट ठाकरे गटाच्या नेत्यावर असंतोष व्यक्त करताना संजय दिना पाटील दिसले. मी ज्यावेळी शिवसेना सोडणार असल्याच्या चर्चा होत्या, त्या नेत्याने माझ्या घराबाहेर येऊन शिव्या दिल्या. माझ्या मुलीला महापालिकेच्या निवडणुकीत त्यांनी तिकिट दिले…

आम्ही नव्हतो गेलो मागायला. माझी मुलगी माझे काम मतदार संघात करत होती. मनसेला ती जागा जाऊ नये, याकरिता त्यांनी माझ्या मुलीला तिकीट दिले. ज्यावेळी चर्चा होती की, शिवसेना ठाकरे गटातील खासदार शिवसेना शिंदे गटाने अज्ञातस्थळी हलवले आहेत, त्यावेळीच थेट संजय दिना पाटील थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नात पोहोचले. या लग्नात ठाकरे कुटुंबिय देखील उपस्थित होते. यादरम्यानच आता संजय दिना पाटील आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा वाघ आता तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? अखेर मनातलं बोलूनच दाखवलं
  • IND vs SL 2nd Test : गौतम गंभीरला तुम्ही कितीही शिव्या घाला पण एकाबाबतीत तो 1 नंबर, कोलंबो टेस्टमध्ये एक निर्णय ठरला मास्टरस्ट्रोक
  • मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षातील खासदारांच्या बैठकीची इनसाइड स्टोरी समोर, नेत्यांना दिलं सर्वात मोठं आश्वासन
  • Amitabh Bachchan : जगभरात त्यांचे लाखो चाहते, पण बिग बी कोणाचे फॅन ? अमिताभ बच्चन यांची आवडती गझल कोणती ?
  • खवड्या डोंगरावर कुणाल या गोष्टीसाठी पोहोचला, पण आईला झाला उशीर, अन्… मावशीचा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in