• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर…. शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज

August 12, 2026 by admin Leave a Comment


सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सुनावणी सुरू असतानाच न्यायालयाबाहेर शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांच्यातील एका प्रसंगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सुनावणीनंतर दोन्ही गटांचे नेते सुप्रीम कोर्टाबाहेर आले असताना राऊत आणि म्हस्के यांच्यात हलकाफुलका संवाद पाहायला मिळाला.

नरेश म्हस्के यांना पाहताच संजय राऊत यांनी त्यांच्याकडे पाहून “यावंच लागणार” अशी मिश्किल टिप्पणी केली. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर परिसरात एकच हशा पिकला. त्यानंतर राऊत यांनी म्हस्के यांना माध्यमांसमोर येण्यासाठी बोलावले.

या प्रकरणाची आता दुसऱ्या दिवशीही तुफान चर्चा आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणी नरेश म्हस्के यांनी आज माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांनी राऊतांवर ‘फेकुचंद’ अशी टीका केली इतकेच नाही तर थेट आव्हान दिले आहे. त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मला मान्य आहे. महत्त्वाचं म्हणजे, शिदंबाबत तक्राकरीचं पत्र तर दाखवा…  जर माझी तक्रारीची अनेक पत्र आहेत, तर ती पत्रे खरंच दाखवा; आणि जर दाखवता आली तर मी राजीनामा देतो, अन् नाही दाखवता आली तर तुम्ही द्या…. पुढे त्यांनी सांगितले की, शिंदेसोबत जाणारा पहिला जिल्हाप्रमुख मी होतो. कोणत्याही अटीवर मी त्यांच्यासोबत आणि त्यांच्या विचारांसोबतच होतो.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Snake : साप पुन्हा आयुष्यात तुमच्या घराकडे फिरकणार नाही, आदिवासी लोकांची ही खास ट्रीक प्रत्येकाला माहिती हवीच
  • Todays Gold Rate: आनंदाची बातमी! सोन्याचे भाव घसरला, आज 10 ग्रॅमसाठी…
  • प्रवाशांचा जीव धोक्यात! कसारा घाटात भरधाव एसटी बसचा चालक मोबाईलवर व्यस्त
  • लग्नानंतर नवऱ्याने सासरी राहायचं, भन्नाट रोमँटिक कॉमेडी सिनेमा; ओटीटीवर नंबर 1 वर होतोय ट्रेंड
  • MPSC FDA पेपरफुटी प्रकरणात लव्ह स्टोरीचा धक्कादायक अँगल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in