• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एकेकाळी फक्त 50 रुपयांची कमाई, आता ‘तारक मेहता..’साठी प्रतिदिन घेतो दीड लाख रुपये

July 14, 2026 by admin Leave a Comment


अभिनेता सलमान खानच्या चित्रपटात एकेकाळी नोकरची भूमिका साकारून फक्त 50 रुपये कमावणारा हा चेहरा आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत मोठा स्टार बनला आहे. गेल्या सोळा वर्षांपासून या अभिनेत्याने एकाच मालिकेवर असा कब्जा मिळवला आहे की, आता त्याच्याशिवाय मालिकेची कोणी कल्पनाच करू शकत नाही. आज तोच कलाकार एका दिवसासाठी जवळपास दीड लाख रुपये मानधन स्वीकारतोय. या अभिनेत्याकडे आता कोट्यवधींची संपत्ती असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण त्याचे चाहते आहेत.

ज्या अभिनेत्याबद्दल आम्ही बोलत आहोत, तो दुसरा-तिसरा कोणी नसून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील दिलीप जोशी आहे. लोक त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने कमी आणि ‘जेठालाल’ म्हणूनच अधिक ओळखतात. दिलीप जोशी यांनी 1989 मध्ये ‘मैंने प्यार किया’ या सलमान खानच्या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांनी सलमान खानच्या नोकराची खोटी भूमिका साकारली होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्या भूमिकेसाठी त्यांना त्यावेळी फक्त पन्नास रुपये मानधन मिळालं होतं. त्यावेळी कदाचित कोणीच हा विचार केला नसेल, की पुढे जाऊन ते टेलिव्हिजनवरील सर्वांत मोठे स्टार बनतील.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dilip Joshi (@maakasamdilipjoshi)

‘मैंने प्यार किया’ या पहिल्या चित्रपटानंतर जेव्हा अपेक्षेप्रमाणे काम मिळत नव्हतं, तेव्हा दिलीप जोशी यांनी अभिनयातून काही काळ ब्रेक घेऊन ट्रॅव्हल एजन्सीचं काम करण्यास सुरुवात केली होती. काही वर्षांपर्यंत त्यांनी हेच काम केलं. नंतर 2008 मध्ये त्यांना त्यांच्या करिअरमधील सर्वांत मोठी ऑफर मिळाली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत त्यांना जेठालालची भूमिका मिळाली आणि बघता बघता ते घराघरात लोकप्रिय झाले. आजही या शोचा उल्लेख केला तर सर्वांत आधी जेठालालचंच नाव घेतलं जातं.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला आता सोळा वर्षे झाली आहेत. मात्र तरीही या मालिकेची आणि त्यातील भूमिकांविषयीची क्रेझ काही कमी झाली नाही. जेठालालचं कॉमिक टायमिंग, मजेशीर अंदाज यांमुळे टीव्हीवरील ही सर्वांत लोकप्रिय भूमिका ठरली आहे. या मालिकेसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये दिलीप जोशी अग्रस्थानी आहेत. रिपोर्ट्सनुसार एका एपिसोडसाठी ते जवळपास दीड लाख रुपये मानधन घेतात. ही मालिका आठवड्यातून पाच दिवस टेलिकास्ट होते. म्हणजेच या मालिकेतून दर आठवड्याला ते लाखो रुपयांची कमाई करतात.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in