• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

एका कुलपाने घेतला 21 जणांचा जीव, दिसेल त्या दिशेने पळत सुटले, दिल्लीच्या भयानक आगीत विदेशी पर्यटकांचाही मृत्यू

June 3, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये आज बुधवारी सकाळी आगीची मोठी घटना घडली. या अग्नीकांडात तब्बल 40 जण अडकली. यापैकी 21 जण जिवंत गळून मेली. या घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे यात काही विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. अनेक जण जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग अगोदर रेस्टारंटला लागली आणि त्यानंतर हॉटेलच्या रूमपर्यंत पोहोचली. काही मिनिटातच आगीने राैद्ररूप धारण केले. लोकांनी आपला जीव वाचवण्याकरिता थेट दुसऱ्या, तिसऱ्या मजल्यावरून खाली उड्या घेतल्या. या हॉटेलमध्ये थांबलेले जवळपास लोक मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या आपल्या नातेवाईकांकरिता या हॉटेलमध्ये थांबले होते. ज्यात विदेशी नागरिकांची संख्या अधिक आहे. या हॉटेलमध्ये 25 पेक्षा जास्त रूम होत्या. मात्र, या इमारतीमधून बाहेर पडण्याकरिता एकच रस्ता आहे.

काही लोक बेसमेंटमध्ये होती. धक्कादायक म्हणजे लोक आगीत आतमध्ये जळत होते पण बेसमेंटला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. डीसीपी अनंत मित्तल यांनी या आगीच्या घटनेबद्दल बोलताना म्हटले की, सूचना मिळाल्यानंतर तात्काल फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. 8 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आतमध्ये अडकलेल्या लोकांना वाचवले जात आहे.

इमारतीमधून आतापर्यंत 40 लोकांना बाहेर काढून रूग्णालयात दाखल करण्यात आले. 21 लोकांचा मृत्यू झाला असून बचावकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिवंत जळालेल्या व्यक्तींमध्ये काही विदेशी नागरिकांचा समावेश आहे. जखमींमध्येही काही विदेशी नागरिक आहेत. यापैकी जास्त करून नातेवाईकांचे उपचार मॅक्समध्ये सुरू असल्याचे ते इथे थांबले होते.

आग लागल्यानंतर स्थानिक लोकांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत मदत सुरू केली. ही इतकी मोठी आग नक्की कशी लागली, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहीये. मात्र, आगीचा मोठा भडका उडाला. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याचाही अंदाज आहे. काही जण या आगीत गंभीर जखमी झालेत. अजूनही बचावकार्य सुरूच असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, या आगीच्या घटनेने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट…
  • अँटिलियामधील सिक्यूरिटी गार्डला किती पगार? आकडा ऐकून चक्रावून जाल
  • हा द्रव पदार्थ म्हणजे सापांचा कर्दनकाळच, महिन्यातून फक्त एकदा शिंपडा, पुन्हा आयुष्यात साप दिसणार नाही
  • Akshaye KhannaMahakali : ‘हा धर्म की अधर्म?’ अक्षय खन्नाच्या ‘शुक्राचार्या’चा धडकी भरवणारा अवतार; ‘महाकाली’चा प्रोमो चर्चेत
  • 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा, CA चे हादरवणारे कारनामे उघड; आज करणार कोर्टात हजर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in