• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उर्मिला-आदिनाथनंतर आणखी एका अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर 6 महिन्यातच सोडलेलं नवऱ्याचं घर

July 18, 2026 by admin Leave a Comment


टीव्ही विश्वातून आणखी एका सेलिब्रिटी जोडप्याच्या नात्यात दुरावा आल्याची बातमी समोर आली आहे. 'नामकरण', 'शहजादी… है तू दिल की' आणि सध्या 'सैराब' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री प्रकृती नौटियाल हिने लग्नाच्या अवघ्या दोन वर्षांत पती वंदित शाह यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

दोघांनीही परस्पर संमतीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी नोव्हेंबरमध्ये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, प्रकृती आणि वंदित यांनी जवळपास सहा महिने एकमेकांना डेट केल्यानंतर 14 फेब्रुवारी 2024 रोजी विवाह केला होता.

प्रेमविवाह करून नव्या आयुष्याची सुरुवात केलेल्या या जोडप्याच्या नात्यात मात्र लग्नानंतर काही काळातच मतभेद निर्माण झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला सर्व काही सुरळीत असले तरी कालांतराने दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

स्वभावातील मतभेद आणि नात्यातील वाढता तणाव यामुळे आपण एकमेकांसाठी योग्य जोडीदार नसल्याची जाणीव दोघांनाही झाली. अखेर नातं टिकवण्यापेक्षा परस्पर संमतीने वेगळं होणंच योग्य ठरेल असा निर्णय त्यांनी घेतला.

वृत्तानुसार, प्रकृतीने लग्नानंतर काही महिन्यांतच, म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये सासरचं घर सोडलं होतं. तेव्हापासून ती पतीपासून वेगळी राहत असून, आता दोघांनीही कायदेशीररित्या वैवाहिक नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या वृत्तावर प्रकृती नौटियाल किंवा वंदित शाह यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तिबेटमध्ये ईशा फाउंडेशनचे ८० भक्त बेपत्ता… सद्गुरूंनी चीनकडे मोठी मागणी, व्हिडिओमध्ये भावूक झाले
  • Plane Crash : बारामतीनंतर आणखी एका ठिकाणी विमान कोसळलं; क्षणार्धात झाले अनेक तुकडे, दोघांचा मृत्यू
  • Nitesh Karale : राष्ट्रवादीचे नितेश कराळे मास्तर पोलिसांच्या ताब्यात; सोशल मीडियावरील एक चूक पडली महागात, राजकीय वर्तुळात खळबळ
  • Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
  • Dev Chaudhary: बॅट धरता येईना, कॅचही घेता येईना, ऑक्शनमध्ये नावंही नाही अन् थेट DPL मध्ये खेळला, विराट कोहलीच्या कोचशी थेट संबंध

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in