• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उद्या लोकलचा प्रवास करताना सावध, संडे मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहा

June 27, 2026 by admin Leave a Comment


मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक जाहीर केला असल्याने लोकलचा प्रवास करण्याआधी मुंबईकरांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडणे फायद्याचे आहे. कारण मध्य रेल्वेने मुख्य मार्गावर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे लोकल ट्रेन रविवारच्या मेगाब्लॉकनुसार धावणार आहेत. त्यामुळे गाड्यांना गर्दी होणार असल्याने सावधानतेने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्य मार्गावर ब्लॉकचा कालावधी: सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

माटुंगा – मुलुंड स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाउन’ धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून स.१०.१४ ते दु. ३.३२ वा. या वेळेत सुटणाऱ्या ‘डाउन’ धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्यांना माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान ‘डाऊन’ जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा ‘डाऊन’ धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्या आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ठाणे येथून सकाळी ११.०७ वा. ते दुपारी ३.५१ वा. या वेळेत सुटणाऱ्या ‘अप’ धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकावर ‘अप’ जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि पुढे माटुंगा येथे पुन्हा ‘अप’ धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यामुळे या लोकल आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे सकाळी ११.०० ते सायंकाळी १७.०० या वेळेत येणाऱ्या किंवा तिथून सुटणाऱ्या सर्व ‘अप’ आणि ‘डाऊन’ लोकल गाड्या त्यांच्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

ट्रान्सहार्बर लोकल सेवा बंद

ठाणे आणि वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान स. ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत

ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान ‘अप’ आणि ‘डाऊन’ ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहणार आहे. ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत वाशी -नेरुळ- पनवेलकडे जाणाऱ्या ‘डाऊन’ मार्गावरील लोकल सेवा आणि पनवेल- नेरुळ- वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्याकडे येणाऱ्या ‘अप’मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही

 



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 100 नवीन वाहनं, अदाणी फाऊंडेशनकडून 15 कोटींचा निधी
  • CCTV फुटेज, रेकॉर्डिंग सगळं बाहेर काढेन; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचा थेट इशारा, म्हणाली ‘27.11.23’ची ती सकाळ आठवतेय?
  • Sugar Price Hike : साखरेचा भाव वाढताच प्रशासनाचा मोठा आदेश, आता 30 दिवसांपेक्षा जास्त काळ…सामान्यांवर काय परिणाम होणार?
  • IND vs SL : रवींद्र जडेजाने अखेर सूड घेण्यासाठी सात दिवस घेतले! श्रीलंकन खेळाडूसोबत काय घडलं होतं?
  • मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in