• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

उदयपूरमध्ये लग्नासाठी महाल बुक, 2 विमाने बुक.. सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा, थेट..

June 26, 2026 by admin Leave a Comment


पुण्यातील केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर मोठी खळबळ उडाली. केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिने लोहगडावरून तब्बल 400 फूट खोल दरीत चेतनला ढकलून दिले. आपल्या प्रियकराच्या मदतीने तिने केतनला संपवले. यादरम्यान 18 जूनला प्रियकर चेतन चाैधरी हा लोहगडावर पोहोचला होता. त्याने आपले लोकेशन गडावर येऊ नये, याकरिता दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा फोन आपल्यासोबत ठेवला होता. याच फोनच्या माध्यमातून तो सिया गोयलच्या संपर्कात होता. पोलिसांनी नीरज कुमार याला माफीचा साक्षीदार ठेवले आहे. कारण त्याच्याच मोबाईलमध्ये महत्वाचे पुरावे आहेत. यादरम्यानच चर्चा होत्या की, अग्रवाल आणि गोयल कुटुंबाकडून सिया आणि केतन यांच्या लग्नासाठी उदयपूरमध्ये महाल बुक केला होता. यासोबतच नातेवाईकांना उदयपूरला नेण्यासाठी दोन विमाने बुक करण्यात आली होती, अशी चर्चा रंगताना दिसत आहे.

याबाबत आता सिया गोयल हिच्या वडिलांनी मोठा खुलासा केला. सियाच्या वडिलांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, उदयपूरला महाल बुक, दोन विमाने बुक हे सर्वकाही खरे नाहीये. असे कोणतेही बुकिंग नव्हते. सर्वकाही टोटल खर्च लग्नाचा देवदेव वगैरे सर्व 4.5 ते 5 कोटीपर्यंत होता. यात सर्वकाही होणार होते. सोन्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, आम्ही काही सोने दिले होते आणि त्यांनी काही सोने सियाला घातले होते.

माझ्या घरात काम सुरू होते. अनेक कामगार घरात असल्याने मी केतनला सोने त्यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले होते. आम्हाला अग्रवाल कुटुंबियांनी लग्न जमल्यानंतर जे काही दिले ते सर्व आम्ही त्यांना परत पाठवून दिले. आता त्यांचे आमच्याकडे काहीच नाहीये. सियाची आई म्हणाली की, माझ्याकडे फक्त सियाची साखरपुड्याची अंगठी आणि एक ब्रेसलेट आहे, त्यांनी दिलेले बाकी काही नाही.

आम्हाला यावर विश्वास बसत नाही. सिया दोषी असेल तर तिला फाशीच व्हायला पाहिजे, अशी मागणी सियाच्या आई वडिलांनी केली. केतनच्या केसबद्दल खुलासा होताच, सियाच्या वडिलांची तब्येत बिघडली असून ते रूग्णालयात उपचार घेत आहेत. यासोबतच त्यांच्याकडून वारंवार सांगितले जात आहे की, आम्हाला याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. जर असे काही असेल तर आम्हालाही शिक्षा द्या.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Inflation: अमेरिकेत महागाई पण झळ बसतेय भारताला; सोनं-चांदी, शेअर मार्केट सगळ्यांवर होणार परिणाम, मध्यमवर्गीयांचे हाल होणार
  • Sandeep Deshpande: बड्या गुन्ह्यातील फरार आरोपींसोबत संजय दिना पाटील करताय काय? त्या गाडीचा फोटो दाखवत संदीप देशपांडे यांचा खोचक सवाल
  • ही तर सियापेक्षाही डेंजर निघाली, साखरपुड्यानंतर थेट बॉयफ्रेंडला..; अंगावर काटा आणणारी घटना!
  • Ram Temple Donation Row : ठाकरेसेनेने राम मंदिरासाठी दान केलेल्या चांदीच्या 4 किलोच्या विटा गायब; संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ
  • Vaibhav Sooryavanshi Video: नाद करतो काय! वैभव बॅटिंगसह बॉलिंगमध्येही सरस, अभिषेक शर्माला असा चेंडू टाकला की त्याची बोलती बंद झाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in