• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ईव्हीला विसरा, पेट्रोलला जबरदस्त पर्याय! 226 किमी मायलेज देणारी Scooter महागाईला झोपवणार

June 12, 2026 by admin Leave a Comment


TVS Jupiter CNG Scooter: इंधन दरवाढीच्या झळांनी सर्वसामान्यांना होरपळून काढले आहे. पेट्रोल महाग झाले आहेत. ईव्ही स्कूटरच्या किंमती आवाक्यात नाहीत. तर चार्जिंगची समस्या कायम आहे. त्यामुळे टीव्हीएस या कंपनीने एक मधला पर्याय शोधला आहे. बजाजने जगातील पहिली CNG बाईक लाँच केली होती. त्याच पावलावर पाऊल ठेवत टीव्हीएस कंपनी लवकरच TVS Jupiter CNG बाजारात उतरवणार आहे. या स्कूटरची सध्या जोरात चर्चा आहे. सीएनजी स्कूटर आल्यास स्कूटर मार्केटमध्ये मोठा खेला होणार आहे. ग्राहकांना एक मोठा पर्याय उपलब्ध होणार आहे.

सीएनजीसह पेट्रोलचा आधार

TVS च्या या स्कूटरमध्ये 124.8 cc चे सिंगल सिलेंडर इंजिन असेल. यामुळे स्कूटरला 5.3 किलोवॅट पॉवर आणि 9.4 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळेल. ही स्कूटर पेट्रोल आणि सीएनजीसह 226 किमीपर्यंत धावणार आहे. स्कूटरच्या इंजिनच्या मदतीने ही स्कूटर 80.5 किमीच्या अतिवेगाने धावेल. 1 किलो CNG मध्ये 84 किलोमीटरपर्यंत धावेल. यामध्ये 2 लीटरची पेट्रोल टँक आणि 1.4 किलोची CNG टँक देण्यात आली आहे.

मॅक्स मेटल बॉडी

स्कूटरच्या दुनियेत सर्वात मोठी सीट देण्याचा दावा करण्यात आला आहे. या स्कूटरमध्ये मॅक्स मेटल बॉडी, एक्सटर्नल फ्युल लिड, फ्रंटमध्ये मोबाईल चार्जर, सेमी डिजिटल स्पीडोमीटर, बॉडी बॅलेन्स टेक्नॉलॉजी, पाय ठेवण्यासाठी मोठी जागा देण्यात येणार आहे. सीट मोठी असल्याने त्यात हेल्मेट आणि तुमचं साहित्य बसू शकतं. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबासाठी ही स्कूटर गेमचेंजर ठरू शकते.

CNG शिफ्टचे बटण

या सीएनजी स्कूटर मध्ये ETFI तंत्रज्ञान, इंटेलीगो टेक्नॉलॉजी, ऑल वन लॉक, साईड स्टँड इंडिकेटरसह इंजिन इनहिबिटर देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला पेट्रोलवरून CNG वर थेट शिफ्ट होता येईल. त्यासाठी एक बटणही देण्यात आले आहे. युझर्स पेट्रोलवरही स्कूटर पळवू शकतात. अथवा त्यांना सीएनजीवर सुद्धा ही स्कूटर दामटता येईल.

किंमत तरी किती?

जानेवारी 2025 मध्ये दिल्लीतील ऑटो एक्स्पोमध्ये टीव्हीएसने Jupiter CNG सर्वात अगोदर समोर आणली होती. आता ही स्कुटर लवकरच बाजारात येण्याची दाट शक्यता आहे. ही देशातील पहिली सीएनजी स्कूटर असेल. या स्कूटरची किंमत जवळपास एक लाख रुपये असू शकते. युझर्सला आता बाईक आणि स्कूटरमध्ये अजून एक नवीन पर्याय उपलब्ध होईल.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Video: वुमन्स टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत उडाली खळबळ, बॅटला बॉल लागला नाही तरी दिलं आऊट
  • फ्लिपकार्ट की ॲमेझॉन… कोणत्या प्लॅटफॉर्मवर आयफोन 17 प्रो मॅक्सवर मिळतेय मोठी सुट, जाणून घ्या
  • Car Tyre Air Tips: कारच्या टायर्समध्ये नायट्रोजन भरावे की सामान्य हवा? फायदा कशात जाणून घ्या?
  • पाऊस आणि दुचाकीचा प्रवास! रस्ते निसरडे होण्यापूर्वी जाणून घ्या सुरक्षित बाईक रायडिंगचे सोपे नियम
  • मृत्यूनंतर नाक आणि कानात कापूस का ठेवला जातो? धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक कारणांचा उलगडा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in