• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

इराणची जगाला धमकी! हाहाकाराला सुरूवात, थेट इतिहासातील सर्वात मोठा हल्ला, इराणने..

July 16, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे दिसतंय. मोठे हल्ले केले जात आहेत. होर्मुज खाडी बंद आहे. त्यामध्येच अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांना पलटवार इराणकडून करण्यात आला. शिवाय जगाची झोप उडवणारी धमकीही त्यांच्याकडून देण्यात आली. इराणने आतापर्यंतच्या सर्वात मोठा पलटवार केल्याचे सांगितले जातंय. तेहरानकडून दावा केला जात आहे की, गुरूवारी इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या लष्कर तळावर भीषण हल्ला केला. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. ज्याने मध्य पूर्वमध्ये हादरा बसला. इराणी सैन्य कमांडरकडून एक प्रेस रिलीज करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की, आता युद्ध कोणत्याही स्थितीपर्यंत पोहोचू शकते. इराणचे सर्वात शक्तीशाली सैन्य संघटना अर्थात इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रवक्ते बिग्रेडियर जनरल मोहेबी यांनी अमेरिकेला खुले आव्हान दिले.

IRGC ने म्हटले की, शत्रूने (अमेरिका) अजिबात या भ्रमात राहू नये की, युद्ध त्यांच्या म्हणण्यानुसार चालेल. थकवणारे एक खूप दिवस चालणाऱ्या युद्धात याचा बदल होऊ शकतो. इराणच्या सध्याच्या लष्करी कारवाया पूर्णपणे आखाती प्रदेशातील अमेरिकेची आक्रमक लष्करी पायाभूत सुविधा आणि तळ नष्ट करण्यासाठी केंद्रीत आहेत.

हे एकदा पू्र्ण झाले की, आमचा विनाशकारीचा दुसरा भाग सुरू होईल. यादरम्यान होर्मुज खाडी बंद यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले की, जोपर्यंत अमेरिका आमच्या प्रमुख 3 अटी मान्य करत नाही, तोपर्यंत होर्मुज खाडी बंदच राहणार आहे. होर्मुज खाडी बंद राहणार असल्याने इराणकडून सांगण्यात आल्याने खळबळ उडाली.

कारण कच्चे तेल आणि एलपीजी गॅसचा पुरवठा होर्मुज खाडीच्या माध्यमातूनच होतो. होर्मुज खाडी बंद असल्याने जागकित बाजारात कच्च्या तेलाचे दर सतत वाढताना दिसत आहेत. जर अमेरिकेला वाटते की, होर्मुज खाडी खुली राहावी तर त्यांना आमच्या अटी मान्य कराव्याच लागतील आणि त्याचे पालनही करावे लागेल. इराण आणि अमेरिका युद्धात जगाची वाट लागताना दिसत आहे. पुन्हा जागतिक बाजारात भूकंप आला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in