
इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण तर केलं. पण फार काळ टिकल्या नाही. अनेकांच करियर फ्लॉप ठरलं तर, काही अभिनेत्रींनी इंडस्ट्रीतील वातावरणाला वैतागून झगमगत्या विश्वापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री निक्की वालिया हिच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. सांगायचं झालं तर, निक्की हिने ‘मिस्टर आजाद’, ‘अकेले हम अकेले तुम’ आणि ‘परदेसी बाबू’ यांसारख्या सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण बॉलिवूडच्या टॉक्सिक वातावरणाला कंटाळून अभिनेत्रीने टीव्ही विश्वात पदार्पण केलं… पण आता तिने इंडस्ट्रीबद्दल असं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
निक्कीने का सोडला बॉलिवूड?
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत निक्की म्हणाली, ‘इंडस्ट्रीबद्दल सोडा, पण त्याकाळात महिलांकडून ज्या गोष्टी मागितल्या जायच्या आणि महिलांसोबत लोकांचा बोलण्याचा जो लहजा होता, तो फार त्रासदायक होता. लोक महिलांना फक्त एका वस्तूच्या नजरेने पाहायचे. लोकं कायम असंच बोलायचे, ये काय गं… अरे ही बघ परत आली… तिला बोलाव…. अशा भाषेचा उपयोग महिलांसाठी केला जायचा. हे सर्व माझ्यासाठी प्रचंड हैराण करणारं होतं आणि मी देखील बसून सर्वकाही फक्त ऐकायचे…’
निक्कीने सांगितले की, चित्रपटसृष्टीचे स्वरूप आणि तिचा स्वतःचा स्वभाव यात फरक होता. यात कोणीही चुकीचं किंवा बरोबर नव्हतं; ना ती बरोबर होती, ना ते चुकीचे होते. तसेच, बॉलीवूड सोडल्यानंतर तिला चित्रपटसृष्टीकडून मोठ्या प्रमाणावर टीकेचा सामना करावा लागला, असंही तिने यावेळी सांगितलं…
अभिनेत्री म्हणते, ‘इंडस्ट्रीकडून होत असलेल्या विरोधाचा मला सामना करावा लागला. एका वेळेनंतर मला कळलं की, निक्की या जाळ्यातून आता तू बाहेर पड. पण जर तू काम गेलीस आणि काम मागायला आलीस तर, या आर्टिकलनंतर तुला काम मिळणार नाही. बाहेर आल्यानंतर मी काही बोलेल याच भीती खाली इंडस्ट्रीतील काही लोक होते.’
‘त्याचा असा विचार होता की, इतकी लहान मुलगी आहे आणि इतकं बोल्ड विधान करत आहे. म्हणजे ही कोणाला घाबरत नाही आणि घाबरु तरी का? पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मी काही खोटं बोलत नाही आणि कोणाचं नाव देखील पुढे केलेलंन नाही…’, असं देखील अभिनेत्री म्हणाली.
बॉलिवूड सोडल्यानंतर निक्की हिने टीव्ही विश्वात पदार्पण केलं. अस्तित्व… एक प्रेम कहानी, दिल संभल जा जरा आणि घर एक सपना या मालिकांमध्ये अभिनेत्रीने काम केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.
Leave a Reply