• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ना अन्न, ना आसरा… जगण्यासाठी चक्क चिखल खातोय श्वान; नेपाळच्या महाप्रलयाचा VIDEO पाहून डोळे पाणावतील

August 31, 2026 by admin Leave a Comment


नेपाळमध्ये पाच दिवसांपूर्वी महाप्रलय आला. या महाप्रलयात सर्वच वाहून गेलं. हजारो संसार उद्ध्वस्त झाले. शेकडो लोकांचा मृत्यू झाला. हजारो लोक वाहून गेले. त्यांचा अद्यापही शोध लागत नाहीये. सर्वत्र चिखल, मातीचे ढिगारे आणि पाणीच पाणी दिसत आहे. या चिखलातून लोक आपल्या नातेवाईकांना शोधत आहेत. ढिगाऱ्याखाली तर कोणी अडकलं नाहीये ना? अशी शंका घेत अनेक नजरा ढिगाऱ्यावर भिरभिरत आहेत. आपल्या आप्तेष्टांचा शोध घेत आहे. अर्ध्या नेपाळमध्ये हेच चित्र दिसत आहे. त्यामुळे सर्वांचीच मने हेलावून जात आहे. मात्र, सोशल मीडियावर एका श्वानाचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तर अनेकांच्या मनात कालवाकालव होत आहे. खायलाच काही मिळत नसल्याने हा श्वान चिखल खाताना दिसत असल्याने अनेकांना हे दृश्य पाहून हुंदका आवरणं कठिण झालं आहे.

नेपाळमधील महाप्रलय हा शतकालीत सर्वात मोठा प्रलय असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रलयाने नेपाळची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमावलं आहे. रक्ताची नाती आपल्या डोळ्यासमोर वाहून जाताना पाहून अनेकांच्या हृदयाचा थरकाप उडाला आहे. या धक्क्यातून लोक अजून सावरलेले नाहीयेत. अशातच एका व्हिडिओने सर्वांना पुन्हा एकदा हादरवून सोडलं आहे. माणसंच नाही तर मुक्या जीवांवरही कशी आपत्ती ओढवलीय हे सांगणारा हा व्हिडीओ आहे.

 

बाढी प्रभावित क्षेत्र बेत्रावती मा कुकुरले माटो खाएर बसिरहेको छ। प्लिज, बोल्न नसक्ने जनावर लाई पनि रासनको व्यवस्था गर्नुस्। प्राण त मानिसको जस्तै होनि कुकुरको पनि।😴 pic.twitter.com/i1xvhwzfGv

— Nirmal Prasai🇳🇵 (@NirmalPrasai5) August 30, 2026

काय दिसतंय व्हिडीओत?

नेपाळच्या बेट्रावती भागातील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत सर्वत्र चिखल दिसतोय. कोलमडलेली घरे, घरांचे आवशेष दिसतात. मोडून पडलेला संसार दिसत आहे. भांडी आणि कपडे दिसत आहेत. आजूबाजूला चिखलाचं साम्राज्य आणि पाणीच पाणी दिसत आहे. आसपास चिटपाखरूही दिसत नाही. नावालाच एखाद दुसरा माणूस दिसत आहे. अशा या स्मशान अवस्था असलेल्या परिसरात केवळ एक पांढरा शुभ्र कुत्रा दिसतोय. हा कुत्रा खाण्यासाठी वणवण करत या परिसरात आलाय. त्याला खायला काहीच मिळत नाहीये. तो भुकेलेला आहे. खाण्याचे पदार्थ शोधण्यासाठी त्याची नजर चोहोबाजूला भिरभिरतेय. काहीच मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे हा श्वान जगण्यासाठी चक्क चिखल खाताना दिसत आहे. त्याचा चिखल खातानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ते पाहून अनेकांच्या काळजात धस्स होतेय. हुंदके आवरणं कठिण होतंय.

कमेंट काय?

या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेत. मुक्या जीवाला वाचवलं पाहिजे, असं लोक सांगत आहे. चिखल खात बसलेल्या या मुक्या प्राण्यासाठी अन्न पदार्थाची सोय करा. माणसांप्रमाणेच कुत्र्यांचेही जीवन तितकेच महत्त्वाचे आहे, असं नेटकरी म्हणत आहेत. एका नेटकऱ्यांनी या श्वानासाठी प्रार्थनाही केली आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महायुतीत खलबत? दरेकरांच्या गडाला शिंदेंचे आव्हान, मुंबई बँकांच्या निवडणुकीत…
  • Ankit Balian Case Update: 25 गोळ्या झाडलेल्या गायकाच्या मृत्यूचे गुढ उलगडलं, त्या एका गाण्यामुळे… धक्कादायक माहिती समोर
  • मी सरकारचा भाग नाही, सुधीर मुनगंटीवार यांचं धक्कादायक विधान; भाजपच्या बैठकीआधीच…
  • दहा वर्षांत बदललं भारताचं उच्च शिक्षणाचं चित्र; विद्यापीठांची संख्या 69% वाढली, तर विद्यार्थ्यांचाही आकडा सकारात्मक
  • ना अन्न, ना आसरा… जगण्यासाठी चक्क चिखल खातोय श्वान; नेपाळच्या महाप्रलयाचा VIDEO पाहून डोळे पाणावतील

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in