
अन्नू कपूर हिंदी सिनेविश्वातील धाकड आणि स्पष्ट वक्तव्य करणारे अभिनेते आहेत. ते कायम महत्त्वाच्या मुद्द्यांवर स्वतःचं परखड मत मांडत असतात. आता त्यांनी इंटिमेट सीनबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी इंटिमेट सीनबद्दल सांगितलं आहे.
इंटिमेट सीन कसे शूट करतात आणि शूट करतना अभिनेते हिरोईनचा फायदा घेतात का? यावर कपूर म्हणाले, 'मी स्वतः पाहिलं आहे, इंटिनेट सीन करताना अनेक अभिनेत्री स्वतःवर असलेलं नियंत्रण गमावून बसतात… एकदा तर, दिग्दर्शकाने कट बोलूनही अभिनेता थांबला नाही…'
अभिनेत्रीच्या अवस्थेबद्दल कपूर म्हणाले, 'अभिनेता थांबतच नव्हता, अशात घाबरलेली अभिनेत्री शूट सोडून पळून गेली आणि दोन दिवस तिने स्वतःला एका खोलीत बंद करुन ठेवलेलं… ', अनेक अभिनेत्रींनी देखील इंटिमेट सीन दरम्यानचा त्यांचा अनुभव सांगितला आहे.
अन्नू कपूर यांनी या गोष्टीचा खुलासा केला की, अनेक अभिनेते बोल्ड सिनचा फायदा घेतात… पण सर्वत अभिनेते असते करत नाहीत. अभिनेता म्हणाला, इंटिमेट सीन दरम्यान, मला कधी असहज वाटलं नाही. मला माझं काम चांगल्या प्रकारे येतं…
अन्नू कपूर सांगतात, “मी नेहमीच इंटिमेट सीन्स अगदी सहजपणे चित्रित केले आहेत. कधीकधी, जेव्हा अभिनेत्री घाबरलेल्या असतात, तेव्हा मी त्यांना विचारतो की त्या ठीक आहेत का. मी त्या अभिनेत्रीला त्यापेक्षा जास्त काही विचारत नाही, कारण जर मी विचारलं, तर ती आणखीनच घाबरून जाईल.




Leave a Reply