
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. कारण भारताने ही मालिका आधाची 3-0 ने गमावली आहे. त्यात एकही विजय न मिळाल्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारताने या सामन्यात चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. तसेच प्लेइंग 11 मध्ये काही बदल असतील असा अंदाजही व्यक्त केला आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेकीचा कौल संध्याकाळी 6.30 वाजता होणार होता. मात्र टीम इंडिया मैदानात पोहोचली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे नेमकं काय झालं? याबाबत उत्सुकता वाढली. पण टीम इंडिया ट्राफिकमध्ये अडकल्याने वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल होण्यास उशीर झाला.
Leave a Reply