• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयफोन 17 प्रचंड स्वस्त होणार? की सगळ्यांचीच घोर निराशा; आयफोन 18 लॉन्च होताच मोठा धक्का बसणार?

June 28, 2026 by admin Leave a Comment


iPhone 18 Launch : हातात महागडा आयफोन असेल तर संबंधित व्यक्तीची वेगळीच छाप पडते. अॅपल कंपनीकडून आयफोनमध्ये दिले जाणारे फिचर्स, त्या फोनचा कॅमेरा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आजही लोक लाखो रुपये खर्च करून आवडीने आयफोन खरेदी करतात. दरवर्षी अॅपल कंपनी नवा आयफोन लॉन्च करते. आपल्या जुन्या फोनमध्ये असलेल्या फिचर्ससह नव्या फिचर्सचा समावेश लॉन्च केलेल्या फोनमध्ये केला जातो. म्हणूनच नव्या आयफोनमध्ये नेमके काय असेल? याची उत्सुकता सर्वांनाच असते. जेव्हा अॅपलचा नवा आयफोन लॉन्च होतो तेव्हा जुन्या आयफोन सिरीजमधील फोनची किंमत कमी होते. परंतु यंदा मात्र वेगळेच घडण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडतंय?

सूत्रांच्या माहितीनुसार यावेळी मात्र नवा आयफोन लॉन्च होण्याआधी आयफोन 17 तसेच आयफोन 16 ची किंमत कमी होण्याची शक्यता नाही. आयफोन 18 लॉन्च झाल्यावर अनेकजण आयफोन 17 घेण्याचा प्लॅन करत आहेत. परंतु अनेकांची हीच इच्छा अपुरी राहण्याची शक्यता आहे. कारण यावेळी आयफोन 18 लॉन्च होण्यापूर्वी आयफोन 17 तसेच इतर सिरीजची किंमत कमी होण्याची शक्यता नाही. फोनचा डिस्प्ले, कॅमेरा, फोनमधील चीप इत्यादी सुटे भाग तयार करण्यासाठी लागणारे सामान महागले आहे. त्यामुळेच आयफोन तयार करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. म्हणूनच आयफोन 18 लॉन्च होण्याआधी आयफोन 17 ची किंमत कमी होण्याची शक्यता नगण्य आहे, असा दावा केला जात आहे.

आयफोन 17 स्वस्त होणार का?

नवा आयफोन लॉन्च झाल्यानंतर लगेच पुढच्या दोन, तीन दिवसांत आयफोनच्या जुन्या सिरीजची किंमत कमी होते. यावेळी या किमतीत फारसा फरक पडण्याची शक्यता नाही. तसा अंदाज व्यक्त केला जातो. दुसरीकडे मीडिया रिपोर्ट्सनुसार जपानमध्ये आयफोन 17 ची किंमत वाढवण्यात आली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये मिळणारा आयफोन 17 चे 256 जीबीचे मॉडेल 129800 येनला मिळत होते. आता हीच किंमत 142,780 येनपर्यंत वाढल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता नवा फोन लॉन्च झाल्यानंतर जुन्या फोन सिरीजची किंमत कमी होण्याची वाट पाहणे फायदेशीर ठरू शकते की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • …तर इराणचं अस्तित्वच नकाशावरून मिटवून टाकू; डोनाल्ड ट्रम्प यांची उघड धमकी
  • रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्…अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक, त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
  • मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर…
  • आयफोन 17 प्रचंड स्वस्त होणार? की सगळ्यांचीच घोर निराशा; आयफोन 18 लॉन्च होताच मोठा धक्का बसणार?
  • उंदीर मारण्याचे एक ग्रॅम औषध टाकून आरोपी काय करणार होता? भायखळा मोहरम केसचा तपास सुरु

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in