• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयपीएल स्पर्धेतील पावरप्लेमध्ये वैभव सूर्यवंशीवर हे दोन खेळाडू भारी, आतापर्यंत अशी आहे कामगिरी

April 20, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल स्पर्धा आता पुढे सरकत असून गुणतालिकेत उलथापालथ होताना दिसत आहे. प्रत्येक सामन्यातील निकालाचा गुणतालिकेत सकारात्मक तसे नकारात्मक प्रभाव पडत आहे. असं असतानाही काही खेळाडूंचा फॉर्म हा चिंतेचा विषय आहे. टी20 क्रिकेटमध्ये पावरप्लेमध्येच सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट होतं. त्यामुळे पहिल्या षटकात बरंच काही अवलंबून असतं. या सहा षटकात फलंदाज गोलंदाजांवर तुटून पडतात. वैभव सूर्यवंशीसारखा खेळाडू पहिल्या चेंडूपासून आक्रमक पवित्रा घेतो. त्यामुळे गोलंदाजांना टप्पा कुठे टाकावा याचही भान राहात नाही. आतापर्यंत वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्स संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. पण त्याच्यापेक्षा दोन खेळाडू हे पावरप्लेचे किंग असल्याचं दिसून आलं आहे. चला जाणून घेऊयात आकडेवारीवरून..

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत 29 सामने खेळले गेले आहे. या सामन्यांची आकडेवारीवरून पावरप्लेमधील टॉप 3 खेळाडूंची नावं काढली आहे. स्ट्राईक रेटच्या बाबतीत वैभव सूर्यवंशीच्या पुढे दोन खेळाडूंची नावं आहेत. वैभव सूर्यवंशीने पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना 249.43 च्या स्ट्राईक रेटने 246 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. पण पंजाब किंग्सचा प्रियांश आर्याने त्याच्या तुलनेत कमी धावा केल्या आहे. पण स्ट्राईकच्या बाबतीत त्याच्या पुढे आहे. त्याने या पर्वातील सहा सामन्यात 257.63 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्यामुळे या यादीत प्रियांश आर्या पहिल्या स्थानावर आहे. प्रियांश आर्यने आतापर्यंत 5 सामन्यात फलंदाजी केली आणि 211 धावा केल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे.

प्रियांश आर्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा आहे. त्याची या स्पर्धेतील सुरूवात काही खास झाली नाही. मात्र दोन तीन सामन्यानंतर त्याला लय सापडली आहे. अभिषेक शर्माने 6 सामन्यात 188 धावा केल्या आहेत. तसेच दोन अर्धशतकं ठोकली आहे. त्याने 253.23 च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या आहेत. त्यामुळे स्ट्राईक रेटच्या बाबतीत पहिल्या स्थानावर प्रियांश आर्या, दुसऱ्या स्थानावर अभिषेक शर्मा आणि तिसऱ्या स्थानावर वैभव सूर्यवंशी आहे. या तिघांव्यतिरिक्त स्ट्राईक रेटच्या बाबतीत त्यांच्या आसपास कोणीच नाही.

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : कामात वारंवार अडथळे येत आहेत? महत्त्वाची कामं पूर्ण होत नाहीयेत? मग करा हे सोपे उपाय
  • कपाळावर किस, मिठीचा प्रयत्न, नागपुरात महिलांसोबत अजब कांड; NGO मधील कारनाम्याने पोलीसही चक्रावले!
  • IPL 2026 स्पर्धेत काळी जादू! चेन्नई सुपर किंग्सने केली बीसीसीआयकडे तक्रार? खरं काय जाणून घ्या
  • या झाडांची करा शेती, होईल लाखोंचा फायदाच फायदा; फक्त 3 महिन्यांत…
  • अखेर जगाला ज्याची भीती तेच घडलं, इराणमध्ये सत्तापालट? लष्कराने थेट…होर्मुझ बंदच राहणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in