• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयटी तरुणीला लग्नासाठी पाहिजे असा मुलगा, सांगितल्या 11 अटी, चौथी अट ऐकून तर डोक्याला मुंग्याच येतील

August 12, 2026 by admin Leave a Comment


मागील काही वर्षांमध्ये लग्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे, ग्रामिण भागांमध्ये तर भीषण वास्तव पहायला मिळत आहे, शेतकरी मुलांची तर लग्नच होत नसल्याने अनेक गावांमध्ये लग्नाचं वय उलटून गेलं तरी देखील विवाह न झालेल्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ग्रामीण भागांमध्येच नाही तर शहरी भागांमध्ये देखील कमी -अधिक प्रमाणत अशीच स्थिती आहे. आपल्या होणारा पती कसा असावा? यासंदर्भाती मुलींच्या अपेक्षा वाढल्या आहेत. दुसरीकडे मुलांच्या देखील आपल्या होणाऱ्या पत्नीकडून अपेक्षा वाढल्यामुळे लग्नाचं वय सरासरी वाढल्याचं दिसून येत आहे. अनेकजण वयाची 30 उलटून गेल्यानंतर लग्न करत आहेत. लग्नाआधी करिअरला प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे देखील लग्नाचं वय हे वाढलं असल्याचं पहायला मिळत आहे.

दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट प्रचंड व्हयरल होत आहे, आपला होणारा पती कसा असावा? त्याच्याकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत? या संदर्भातील एका तरुणीची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. तीने आपल्या विवाह बायोडाटामध्ये एकून 11 अटी घातल्या आहेत. या अटी वाचून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या पोस्टवर तरुणाईकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

काय आहेत या अटी?  

या तरुणीने ज्या अटी घातल्या आहेत, त्यातील सगळ्या महत्त्वाची आणि पहिली अट आहे ती म्हणजे मुलाची उंची ही 6 फूट असावी, दुसरी अट आहे ती म्हणजे त्याचा पगार दर महिन्याला कमीत कमी 2 लाख इतरा असावा, तिसरी अट तो नैसर्गिकरित्या सुंदर असावा, चौथी अट ऐकून तर तुम्हालाही धक्का बसेल चौथी अटीमध्ये या मुलीने म्हटलं आहे की, तो आपल्यासाठी 24 तास आणि आठवड्यातील आठही देश उपलब्ध असावा, त्याचा वेळ हा आपल्यासाठीच असावा. त्याला स्वयंपाक आला पाहिजे, तो सोशल मीडियाचा वापर केला नाही पाहिजे, त्याला एकही महिला मैत्रीण नसावी, त्याने कधीही ड्रीक केलं नाही पाहिजे, तसेच त्याने आपल्याला वर्षातून एक तरी फॉरेन ट्रीप घडवून आणली पाहिजे, अशा या तरुणीच्या अटी आहेत.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in