• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आयटी इंजिनिअरने वेबसिरीज पाहून रचला पत्नीच्या हत्येचा कट, हत्यार लपवले, पण अखेर…

August 7, 2026 by admin Leave a Comment


दिल्लीच्या गगन विहार परिसरात एका विवाहितेच्या मर्डर मिस्ट्रीने पोलिसांची देखील झोप उडाली आहे. पोलिसांच्या दाव्यानुसार ६२ वर्षांच्या सॉफ्टवेअर कंसल्टेन्ट कमल सिंह यांनी त्यांची पत्नी कोमल सिंह हीची हत्या केली आहे. संपूर्ण घटना एका क्राईम वेब सिरीजला पाहून केल्याचे तपासात उघडकीस आहे. हत्या केल्यानंतर पतीने कमल सिंह याने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला सुमारे १२ लाख ७५ हजार रुपये रोख घेऊन नेपाळ पळण्याची योजना आखली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्याला मथुरा जंक्शन रेल्वे स्थानकातून पकडले.

कमल आणि कोमल यांचे वैवाहिक जीवन सुमारे एक वर्षांपासून तणावग्रस्त होते. मुंबईच्या प्रवासात कमल याचे एका दुसऱ्या महिलेसोबत जवळीक वाढली होती. त्यानंतर पत्नीपासून ते वेगळे रहात होते. तपासात उघडकीस आले की कमल यांना जगतपुरी भागात एक प्रॉपर्टी खरेदी करु इच्छीत होते. त्याची रजिस्ट्रेशन ते वडीलांच्या नावे करु इच्छीत होते. जर कोमल यांना या प्रॉपर्टीत हिस्सा हवा होता. यावरुन दोघा पती आणि पत्नीत वारंवार भांडणे होत होती. या भांडणातून जुलै महिन्यात कमल यांनी पत्नी कोमल हीच्या हत्येचा प्लान रचला. त्याने यासाठी हरीनगर येथून एक तलवार खरेदी केली आणि तिला लपवुन ठेवले.

कमल सिंह हे एचबीओवरील चर्चित क्राईम सिरीज द स्टेअरकेस (The Staircase) पाहात होते. त्या सिरीजच्या कहाणीत पत्नीची हत्या होते. मात्र, त्याचे हत्यार कधी सापडत नाही. कमल याला देखील अशाच प्रकारे पत्नीची हत्या करुन हत्यार लपवायचे होते आणि पुरावे कमजोर होतील अशी त्याची योजना होती.

10 मिनिटात हत्या केली..

30 जुलैच्या दुपारी घरात केवळ कमल आणि कोमल पती आणि पत्नी हजर होते. मुलगा लायब्ररीत गेला होता. मुलगी ऑफीसला गेली होती. तर घरगुती नोकर देखील घरातून बाहेर गेला होता. दुपारी १२.४५ वाजता कमल बाल्कनीत पत्नी जेथे कपडे वाळत होती तेथे गेला आणि त्याने पाठून तलवारीने पत्नी कोमलच्या डोक्यात प्रहार केला. हल्ल्यानंतर प्राण वाचवण्यासाठी कोमल स्वंयपाक घरात पळाली. मात्र, कमल याने कोमल हीचे केस पकडून तिला खेचले आणि नंतर कात्रीने अनेक वार तिच्यावर केले. पोस्टमार्टेममध्ये कोमल यांच्या शरीरावर दहा गंभीर घाव आढळले. दहा मिनिटात कमल याने कोमल यांची हत्या केली.

किंकाळ्यांनी घरे हादरले..

कोमल यांच्या किंकाळ्या संपूर्ण घर हादरले. कमल याच्या वडीलांनी घरातील अन्य सदस्यांना जाऊन पाहण्यास सांगितले होते. परंतू त्यांनी म्हटले की जाऊ दे कोणीच कोमल यांना वाचवले नाही.

पत्नीच्या हत्येनंतर पलायनाची योजना

आरोपीने पत्नीची हत्या केल्यानंतर रक्ताने भरलेले कपडे आणि हत्याराला एका बॅगेत ठेवले होते. तलवारीचा टोक दिसू नये म्हणून त्याला उशीच्या कव्हरने लपवले. त्यानंतर १५ मिनिटे आंघोळ केल्यानंतर कमल सिंह स्कूटरने घरातून बाहेर पडले. रस्त्यात त्याने हत्येतील शस्र लपवलेली बॅग निर्जन ठिकाणी टाकून दिली. त्याने दोन बँकातून सात लाख रुपये काढले. याशिवाय घरातून पाच लाख रुपये घेतले होते. त्याच्याकडे १२.७५ लाख रुपये रोख होते.

मुख्य हत्यार सापडले नाही…

कमल यांचा २६ वर्षांचा मुलगा गौरव सिंह दिवसभर नोएडा येथील लायब्ररीत मेडिकल पीजी प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. त्याने दिवसभरात आईला अनेकदा कॉल केला, परंतू कॉल उचलला गेला नाही. रात्री सव्वा नऊ वाजता गौरव घरी परतला आणि दुसऱ्या चावीने त्याने दरवाजा उघडला तर त्याला त्याच्या आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्या आईच्या मृतदेहाशेजारी त्याला कात्री देखील दिसली. मात्र, मुख्य हत्यार तलवार त्याला तेथे आढळली नाही. तर वडील घरातून फरार झाले होते. सुरुवातीला गोरखपूरच्या दिशेने जाऊन आरोपीने मोबाईल फोन सुरु केला आणि नेपाळला पळाल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी २ ऑगस्ट रोजी मथुरा रेल्वे स्थानकातून अटक केली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in