• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आम्ही डायर नाही, पण ‘कायर’ बघितला, दिल्लीतील CJP आंदोलनावर मनसेचे संदीप देशपांडे यांची खरमरीत टीका

July 21, 2026 by admin Leave a Comment


Sandeep Deshpande on CJP Delhi Protest: NEET परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटी, त्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, कॉक्रोच जनता पार्टीने पुकारलेले आंदोलनाने देश ढळवून निघाला आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे 20 दिवसांच्या उपोषणाने देशातील धुमसत असलेला असंतोष समोर आला. काल संसदेच्या दिशनेने आंदोलक कूच करणार होते. त्यांना रोखताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये धुमश्चक्री उडाली. गेल्या दोन दिवसांपासून आंदोलक आणि पोलिसांमध्ये शा‍ब्दिक बाचाबाची सुरू होती. काल पोलिसांनी लाठीमार केल्याने आंदोलन चिघळले. अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. त्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात 100 हून अधिक पोलीस जखमी झाले. तर अनेक वाहनांचं नुकसान झाले. या सर्व हिंसेवर मनसे नेते संदीप देशापांडे हे आक्रमक झाले. त्यांनी आंदोलनावर खरमरीत टीका केली.

डायर नाही कायर पाहिला

जंतरमंतरवरून आंदोलक संसदेच्या दिशेने निघाले. पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यानंतर दिल्लीतील कालच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. दोन्ही गटात धुमश्चक्री उडाली. लाठीचार्जवर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. विरोधकांनी सरकारला संसदेत धारेवर धरले आहे. तर विरोधकांकडून सोशल मीडियाचा शस्त्र म्हणून वापर करण्यात येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

आम्ही जालियनवाला बागमध्ये गोळ्या झाडणारा जनरल डायर नाही बघितला पण विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठी चालवणारा “कायर “बघितला, अशी खरमरीत टीका संदीप देशपांडे यांनी केली. मनसे नेते अमित ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा सरकारच्या भूमिकेवर सडकून टीका केली.

अर्थात सलाम कवितेतून टीका

तर काल संदीप देशपांडे यांनी काल सलाम ही विंडबनात्मक कविता सादर केली होती. सलाम सलाम सलाम, लोकशाही सुरू असलेल्या हुकुमशाहीला सलाम, अशा आशयाची सलाम कविता त्यांनी सादर केली. या कवितेतून त्यांनी सध्याच्या देशातील घाडमोडींवर जोरदार टीका केली. या कवितेत त्यांनी न्यायपालिका आणि इतर अनेक घटनात्मक संस्थांच्या भूमिकेवरही टीका केली. सध्या देशात लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही लादल्या जात आहे, असा आशय त्यांनी या कवितेतून मांडला.

आम्ही जालियन वाला बाग मध्ये गोळ्या झाडणारा जनरल डायर नाही बघितला पण विद्यर्थ्यांवर अमानुष पणे लाठी चालवणारा “कायर “बघितला pic.twitter.com/hnnX2Bb5QX

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 21, 2026

पोलिसांनी गुंडाप्रमाणे वागू नये

दरम्यान आता सकाळी संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी कालच्या घडामोडींवरून सरकारवर निशाणा साधला. हे विद्यार्थी चीन, पाकिस्तानातून आलेले नाही. ते आपलेच विद्यार्थी आहेत. आपल्याच लोकांशी असं कसं वागू शकतात? सरकारला सत्तेचा माज आला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांना आमचा सलाम आहे. मुलींचे केस ओढत आहेत. आपण सगळ्यांनीच याविरोधात बोलायला हवे, असे देशपांडे म्हणाले.

एकवेळ आम्हाला गुंड म्हटलेले चालेले, पण षंढ म्हटलेले चालणार नाही. सरकारमध्ये कोणावर तरी जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. अत्यंत भयावह चित्र आहे. आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही आंदोलनास्थळी भेट दिली आहे. प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. पोलिसांनी पोलिसांप्रमाणे वागावे, त्यांनी गुंडाप्रमाणे वागू नये. ते सरकारला जबाबदार नाहीत, तर भारतीय राज्य घटनेला जबाबदार आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं. काल की परवा मी नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकत होतो. त्यावेळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना ते सल्ला देत होते की लाठीचार्ज करणे चुकीचे आहे. एकदा स्वतःचं भाषण त्यांनी ऐकले पाहिजे, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.

उद्या दिवसभर आंदोलन

महारष्ट्र नव निर्माण सेना आझाद मैदानात उद्या दिवसभर आंदोलन करणार करणार आहेत.जो अधिकारी ११ वर्ष एकच विभागात बसून आहे त्यावर कोणतीही कारवाई नाही. जबाबदारी निश्चिती न करणाऱ्या प्रशासनाविरोधात आणि व्यवस्थेविरोधात आहे. ज्या व्यवस्थेत कोणीही जबाबदारी घेत नाही त्या व्यवस्थेविरोधातील आंदोलन करणार आहोत. सगळ्या मुंबईकरांना आवाहन करत आहोत की उद्या या. आयुक्त कोणत्याही पत्राचे उत्तर देत नाही, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला.

मोदी पेक्षा भिडे मोठ्या झाल्या. मोदींना तर इगो आहेत पण त्यापेक्षा भिडे यांना जास्त इगो आहे. मी कोणताही बॅनर बघितला नाही. हे आता काहीही सांगतील, पाकिस्तान युक्रेनचा उल्लेख करायला पण कमी करणार नाही. ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देत आहे. कालच चित्र मानलं अस्वस्थ करणार चित्र होतं. संपूर्ण भारत देश अस्वस्थ आहे. व्यवस्थेने ही गोष्ट ओळखली पाहिजे. जो सामान्य माणूस विचारधारेला बांधिल नाही तो रस्तावर उतरतो त्यावेळी धोक्याची घंटा ओळखली पाहिजे .याला जबाबदार सरकार आहे. २० दिवसात का नाही बोलाव वाटलं सरकारला? संवाद साधायला नेमका कोणता अहंकार आहे. लोकांनी निवडून दिलं त्यांच्याशी बोलायचं नाही हे काय आहे नेमकं. अमानुष पणे लाठी चार्ज केला त्याचा निषेध करतो, अशी टीका देशपांडे यांनी केली.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकनाथ शिंदेंनी मध्येच भाषण थांबवलं: परभणीत भरमंचावर असं काय घडलं?
  • ममता बॅनर्जींना पुन्हा जबर धक्का! आणखी काही आमदार भाजपच्या वाटेवर? नव्या ऑपरेशन लोटसची देशात चर्चा
  • तुकाराम मुंढेंची हवा, अभिनेत्रीला हॉटेलात आला असा अनुभव की…म्हणाली आता भीतीच संपली!
  • Ritu Tawade | मुंबईच्या महापौरांचे पती म्हणून भलत्याचाच फोटो, बदनामी केल्या प्रकरणी युट्यूब चॅनलवर गुन्हा
  • मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी डुप्लिकेट नितेश राणे थेट अंतवाली सराटीत, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in