• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आमिर खान 60 व्या वर्षी या देशात साजरा करणार गौरीसोबत हनीमून? सोबत असणार दोन्ही मुलं

July 11, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान आणि त्यांची पत्नी गौरी स्प्रॅट यांनी लग्नानंतरचा पहिला परदेश दौरा सुरू केला आहे. 5 जुलै रोजी मुंबईतील निवासस्थानी अत्यंत खासगी आणि साध्या समारंभात विवाहबद्ध झालेल्या या जोडप्याने लग्नानंतर अवघ्या आठवड्याभरात ऑस्ट्रेलियाचा मार्ग धरला आहे. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांचा समतोल साधण्यासाठी आमिरने हा दौरा नियोजित केल्याचे सांगितले जात आहे.

‘डेक्कन क्रॉनिकल’च्या वृत्तानुसार, या विशेष दौऱ्यावर आमिर आणि गौरी दोघेच नसून त्यांच्यासोबत त्यांची मुलेही आहेत. आमिर खान आणि त्यांची माजी पत्नी किरण राव यांचा मुलगा आझाद राव खान तसेच गौरी स्प्रॅट यांच्या पूर्वीच्या विवाहातून झालेला मुलगा क्विन हे दोघेही या प्रवासात सहभागी झाले आहेत.

या ट्रिपमागे केवळ सुट्टीचा उद्देश नसून दोन्ही मुलांना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची आणि त्यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्याची संधी मिळावी अशी आमिर खानची इच्छा असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे. तसेच आमिर खानलाही त्याच्या सावत्र मुलगा क्विनसोबत दर्जेदार वेळ घालवायचा आहे.

मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्येही सहभाग

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आमिर खान मेलबर्न येथे होणाऱ्या 17 व्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न 2026 मध्येही सहभागी होणार आहेत. यंदाच्या महोत्सवात त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्याला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ (पुरुष) या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.

या पुरस्कारासाठी आमिर खान याच्यासोबत रणवीर सिंह (‘धुरंधर’), ऋषभ शेट्टी (‘कांतारा : ए लेजेंड – चॅप्टर 1’), अहान पांडे, ममूटी आणि दुलकर सलमान यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार आहे. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी राणी मुखर्जी, कीर्ती कुल्हारी, नीना गुप्ता आणि यामी गौतम यांसारख्या अभिनेत्रींची नावे चर्चेत आहेत.

लग्नानंतर पहिल्यांदाच रेड कार्पेटवर एकत्र दिसण्याची शक्यता

या महोत्सवादरम्यान आमिर खान आणि गौरी स्प्रॅट हे लग्नानंतर प्रथमच एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय रेड कार्पेटवर एकत्र दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष आता या जोडीच्या सार्वजनिक उपस्थितीकडे लागले आहे.

लग्नानंतरचा हा पहिला परदेश दौरा, मुलांसोबतचा कौटुंबिक वेळ आणि प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सहभाग यामुळे आमिर खान आणि गौरी स्प्रॅट यांचा ऑस्ट्रेलिया दौरा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Rakshabandhan 2026 : भावाला राखी बांधण्याची योग्य मुहूर्त कोणता? वेळच सण साजरा करा
  • तू अर्ध्या रात्री आवाज दे, मी एका आवाजावर येईन म्हणाला होतास..; खवड्या डोंगर प्रकरणातील कुणालच्या मावस बहिणीची पोस्ट पाहून डोळ्यात येईल पाणी
  • Abhijit Dipke : अभिजीत दीपकेंना सर्वात मोठा धक्का, गावात जाताच सीजेपी कार्यकर्त्यांवर गुन्हे, महाराष्ट्रातच…
  • नेपाळमध्ये महापुराने हाहाकार! 105 भारतीयांसह तब्बल 291 पर्यटक बेपत्ता; हजारो लोकांचा संसार उद्ध्वस्त
  • Sneha Wagh : कौटुंबिक हिंसाचार, दोन घटस्फोट, स्नेहा वाघ आता तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात? अखेर मनातलं बोलूनच दाखवलं

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in