• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आपण मुस्लीम आहोत का? फरहानने धर्माबद्दल विचारताच जावेद अख्तर स्पष्टच बोलले..

September 4, 2026 by admin Leave a Comment


प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर कायम त्यांच्या बेधडक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. धर्माबद्दल देखील त्यांनी अनेकगा मोठं वक्तव्य केलं आहे. जावेद अख्तर नास्तिक आहेत आणि अनेकदा यावर त्यांनी मोठा खुलासा केला आहे. दरम्यान, जावेद अख्तर यांनी मुलांचे संस्कार आणि धर्मांबद्दल मोठा खुलासा केला. फरहान अख्तर जेव्हा 7 – 8 वर्षांचा होता, तेव्हा शाळेतून परतल्यानंतर, त्याने वडिलांना विचारलं आपण मुस्लीम आहोत का? जावेद अख्तर यांनी अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाने विचारलेल्या एका निरागस प्रश्नाची आठवण सांगितली. त्यांनी स्पष्ट केलं की, त्यांनी मुलं फरहान आणि झोया अख्तर यांना कधीही कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडले नाही. जसजशी दोघे मोठी झाली, तसतशी त्यांनी स्वतःहून धर्माबद्दल माहिती करून घेण्यास सुरुवात केली; परंतु त्यांनी त्यांच्यावर कोणतीही धार्मिक ओळख कधीच लादली नाही.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर म्हणाले, माझी मुलं ‘areligious’ म्हणजे, कोणत्या धर्माशी त्यांचा संबंध नाही. जर माझ्या जागी दुसरा कोणता बाप असता, तर त्याने मुलांना पूजा पाठ करायलं शिकवलं असतं. मुले साधारण 11 किंवा 12 वर्षांची होतात, तेव्हा त्यांना आपल्या धर्माची जाणीव होऊ लागते. मला आठवतं, फरहान तेव्हा साधारण 7 किंवा 8 वर्षांचा होता. एके दिवशी तो शाळेतून परतला; खांद्यावर दप्तर असूनही तो धावतच माझ्याकडे आला, कारण त्याला काहीतरी महत्त्वाचं विचारायचं होतं. फरहानने मला विचारलं, “आपण मुस्लिम आहोत का?’

जावेद यांनी सांगितल्यानुसार, त्यांनी मुलाला समजावलं की, जेव्हा कोणत्या मुलाचा जन्म होतो, तो कोणत्या शहरात जन्म घेतो, जसं पुणे, मुंबई, अहमदाबाद, लंडन, न्यूयॉर्क… कुठेही लहान बाळाचा जन्म होऊ दे… एखादी व्यक्ती कोणत्या शहरात किंवा समाजात जन्माला आली आहे, याने काही फरक पडत नाही; सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात. त्यांनी नमूद केले की, फरहान आणि झोया यांचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही.

फरहान आणि झोया अख्तर यांचं वडील जावेद अख्तर यांच्यासोबत फार जवळचं नाही. दोघे जावेद अख्तर आणि हनी ईराणी यांची मुलं आहेत. गीतकाराला आपल्या दोन मुलांच्या यशाचा अभिमान वाटतो. त्यांच्या मते, दोन्ही मुलांनी पालकांच्या कोणत्याही मदतीशिवाय किंवा योगदानाशिवाय, पूर्णपणे स्वतःच्या कर्तृत्वावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि यश संपादन केलं.

ते म्हणतात, “यश मिळवण्यासाठी माझ्या मुलांनी कधीही तडजोड केली नाही; प्रसिद्धी किंवा पैशासाठी त्यांनी कधीही निकृष्ट दर्जाचं किंवा अश्लील काम केलं नाही आणि आपली प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केला. .” असं देखील जावेद अख्तर म्हणाले.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुण्यात हल्ला झाल्यानंतर विद्यानंद बापट यांची मोठी घोषणा, मारहाणीनंतर पहिल्यांदा आले समोर
  • कुस्ती खेळाडू अश्विनी पौळ यांच्या आयुष्यात तीन महिन्यांपासून मोठे वादळ, नवऱ्याच्या..
  • अखेर त्या भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल; अपघातानंतर गावकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक, चाळीसगावात घडलं काय?
  • Nagpur DJ Ban : मुख्यमंत्र्यांच्या नागपूरात भाजपचा शहराध्यक्ष म्हणतो ‘आम्ही डीजे वाजवणारचं’
  • CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in