• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आधी डीजेवर आवाज उठवला, आता नेत्यांचं टेन्शन वाढवलं, विद्यानंद बापट यांच्या नव्या मागणीने मोठी खळबळ

September 5, 2026 by admin Leave a Comment


सध्या राज्यभरात डीजेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सण उत्सवाच्या काळात डीजे असावा की नाही? यावरून राज्यात दोन मतप्रवाह पडल्याचं दिसून येत आहे, काही जण डीजेचं समर्थन करताना दिसत आहेत, तर काही जण सण उत्सवाच्या काळात होणाऱ्या डीजेच्या वापराला विरोध करताना दिसत आहेत. पुण्यामधील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी सणसमारंभात वाजवण्यात येणाऱ्या डीजेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी डीजेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे, दरम्यान विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यभरात वातावरण तापलेलं असतानाच आता बापट यांनी राजकीय नेत्यांचं देखील टेन्शन वाढवलं आहे. त्यांनी आता थेट  आपला मोर्च हा राजकीय नेत्यांच्या सभा आणि मिरवणुकीकडे वळवला आहे. नेत्यांच्या सभा, मिरवणूका, लग्नकार्य आणि ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होते त्या ठिकाणी डीजे बंद असावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले विद्यानंद बापट? 

निवडून येणाऱ्याला आनंद आहे, मात्र त्यांनी सार्वजनिक ठिकाणी ध्वनीप्रदूषण करणे हे योग्य नाही. लग्नकार्य आणि इतर उत्सवात डीजे वाजवीणे म्हणजे एकाने वाजविले की दुसरे वाजवतात. डीजे विरोधात मी टोकाची भूमिका घेत नाही, मी फक्त त्याच्यावरती सोल्युशन सांगतोय.  सध्या एक नरेटिव्ह सेट केला जातोय, सध्याचे उत्सव केले जातात तेच उत्सव खरे आहेत, असं पसरवलं जात आहे.  या उत्सवात कसलाही बदल होणार नाही, असा नरेटिव्ह सेट केला जात आहे. यामुळे कुणाचं मन किंवा भावना दुखावली जात आहे, हेच मुळात हास्यपद आहे, असं यावेळी बापट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, डीजेमुळे लोकांचे कान आणि छाती दुखते ही बाब निर्विवाद आहे.  तुमचा आनंद हा इतरांसाठी शिक्षा नसायला हवा. उत्सव हे काल सुसंगत आणि निरुपवाद असावेत असा आमचा आग्रह आहे.  काळानुरूप बदल झाले नाहीत ही विज्ञानाची बाब आहे. मला ज्यांनी मारहाण केली, त्या संतोष चव्हाण यांना संग्राम भंडारे यांनी सोन्याचे कडे दिले, मात्र मला माहिती आहे, ते हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत. परंतु मला माझं काम करायचं ,आहे. दहीहंडीत माझा AI टेक्नॉलॉजी वर एक व्हिडिओ बनवून नाचताना दाखवला जातोय. मात्र बघणाऱ्याने सदसदविवेक बुद्धी शाबूत ठेवावी. मुख्यमंत्री म्हणालेत पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे व्हावेत, यावर चर्चेने तोडगा निघू शकतो. मुख्यमंत्र्यांनी म्हणाले तर हे होऊ शकतं. असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • दुलीप ट्रॉफी अंतिम फेरीत शमीचं ‘शतक’, क्रिकेट अशोसिएशन ऑफ बंगालने केलं सन्मानित
  • Vastu Shastra : तुमच्याही घरात असतील या वस्तू तर घरात कधीच टिकणार नाही पैसा, वास्तुशास्त्र काय सांगतं?
  • Gulabrao Patil : ‘हम दो हमारे दो और… इंग्लिश में जाने दो’ भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
  • Chanakya Niti : आयुष्यात या तीन गोष्टी प्रत्येक माणसाकडे हव्याच, चाणक्यांनी दिला मोलाचा सल्ला
  • 2252 किमीची राईड, कारगिलमध्ये फडकवला 1000 फुटांचा तिरंगा अन् सांगता डोंबिवलीच्या दहीहंडीत; रोहित आचरेकरांचा अंगावर काटा आणणारा प्रवास

Recent Comments

No comments to show.

Archives

  • September 2026
  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in