• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आधी कॉफी, मग आंघोळ, नंतर लुंगी डान्स; 4 लाखांची बाईक घेऊन पोबारा ; शोरूममध्ये चोराचा कारनामा

August 12, 2026 by admin Leave a Comment


वाराणसीत चोरीची एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. मंडुआडीह परिसरातील एका ऑटोमोबाईल शोरूममध्ये चोराने कटरने काचेचा दरवाजा कापून प्रवेश केला आणि चोरी करण्याआधी तब्बल साडेचार तास शोरूममध्ये अक्षरशः मौज केली ! रात्री उशीरा एका चोराने कटरने दरवाजा कापून आत एंट्री घेतली. त्यानंतर तो सुमारे 4-4.30 तास त्याच शोरूममध्ये होता. आधी तो कॉफी प्यायला, तिथल्याच वॉशरूममध्ये त्याने अंघोळ केली, कॉम्प्युटरवर गाणी वाजवत, बाईकच्या कव्हरची लुंगी नेसून डान्स केला आणि सगळ्यात शेवटी तो मॅनेजरची साडेचार लाखांची ब्रँड न्यू बाईक घेऊन फरार झालासंपूर्ण घटना त्या शोरूममधल्या सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर झाली. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले, समोरचं दृश्य पाहून तेही हैराण झाले. सध्या त्चाय फुटेजच्या आणि फिंगरप्रिंट्सच्या मदतीने चोराचा कसून शोध घेतला जात आहे.

कटरने दरवाजा कापून आत एंट्री

सोमवारी रात्री 10 च्य सुमारास शोरूम मबंद करून स्टाफ आपापल्या घरी निघून गेला. त्यानंतर रात्री 11:30 च्या सुमारास एक तरुण तिथे पोहोचला. अंगावर पांढरा शर्ट आणि जीन्स… सुरुवातीला अगदी सामान्य दिसणाऱ्या या तरूणाने काही वेळातच त्याने शोरूमच्या काचेच्या दरवाजावर कटर चालवायला सुरुवात केली. तब्बल 36 मिनिटांच्या मेहनतीनंतर रात्री 12:06 वाजता त्याने दरवाजा कापला आणि शोरूममध्ये प्रवेश केला.

आत शिरल्यानंतर मात्र चोरीपेक्षा तो शोरूमचा ‘आनंद’ घेण्यातच जास्त इंटरेस्टेड असल्याचं दिसून आलं. कारण सर्वात पहिले त्याने कॉम्प्युटर सुरू केला, रिव्हॉल्व्हिंग खुर्चीवर बसून गोल-गोल फिरला. त्यानंतर मिनी फ्रिजमधून थंड पाणी काढून प्यायलं आणि मशीनमधून गरमागरम कॉफी बनवून तो आरामात ती पीत बसला.

निवांत केली अंघोळ

पण खरी गंमत तर पुढे होती, कारण तिथून तो चोर थेट वॉशरूममध्ये गेला आणि त्याने निवांत आंघोळ केली. आंघोळीनंतर त्याने आपले ओले कपडे बाईकवर वाळत घातले. त्यानंतर त्याची नजर नव्या बाईकच्या कव्हरवर पडली. त्याने ते कव्हर फाडून त्याची चक्क लुंगी बनवली ना राव !

गाणी सुरू करून लुंगी डान्सही

त्यानंतर याच चोराने कॉम्प्युटरवर गाणी सुरू केली आणि मग शोरूममध्येच सुरू झाला त्याचा ‘लुंगी डान्स’. सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्याचा हा भन्नाट प्रकार कैद झाला आहे. अखेर जाता जाता त्याने एजन्सीचा ब्रँडेड टी-शर्ट आणि कॅपही घातली आणि एक नवीन बाईक कव्हरही सोबत घेतलं.

यानंतर पहाटे सुमारे 4 वाजता त्याने मॅनेजरची KTM Adventure 390 S, ही साधारण चार-साडेचार लाखांची बाईक सुरू केली आणि शोरूममधून चक्क पसार झाला. सकाळी कामावर आलेल्या सुरक्षा रक्षकाला काचेचा दरवाजा तुटलेला दिसल्यानंतर त्याने मॅनेजरला फोन करून लगेच घडलेल्या घटनेची माहिती दिली. या चोरीबद्दल पोलिसांनाही कळवण्यात आलं. त्यानंतर मंडुआडीह पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. सीसीटीव्ही फुटेज आणि फिंगरप्रिंट्सच्या सहाय्याने त्यांनी आता या चोराचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तुमची किंमत ओळखा आणि…, फोटो पोस्ट करत काजोलने चाहत्यांना दिला महत्त्वाचा सल्ला
  • Jasprit Bumrah: बुमराहला मिळाली सर्वात मोठी वाईट बातमी, दोन वर्षात पहिल्यांदाच असं घडलं की…दबदबाच कमी
  • MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
  • इथं चिमुकले होरपळले अन् ते पाणीपुरी… तो व्हिडिओ दाखवत सुषमा अंधारे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर जळजळीत टीका
  • जमिनीची कटकट संपली, आता तलावांवर तरंगणार सोलर पॅनेल; सूर्यास्तानंतरही मिळणार अखंड वीज पुरवठा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in