• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता सांगूनच टाकतो… अमिताभ बच्चन यांचं एक ट्विट, मोठी खळबळ, नवा वाद; अडचण वाढणार?

July 7, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन सध्या एका ट्विटमुळे वादात सापडले आहेत. या ट्विटमुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांनी असं काही ट्विट केलंय की उच्चशिक्षित लोकही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. सध्या फीफा वर्ल्ड कप 2026 सुरू आहे. या फुटबॉल वर्ल्डकपवर त्यांनी एक ट्विट करून वादाला अंगाला लावून घेतला आहे. या ट्विटमुळे अमिताभ बच्चन पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाले आहेत.

फ्रान्सच्या फुटबॉल टीमने पराग्वेला पराभूत करून फीफा विश्व कपच्या पुढच्या भागात स्थान मिळवलं आहे. फ्रान्सच्या या विजयावर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे. अमिताभ बच्चन यांनी 6 जुलै 2026 रोजी हे ट्विट केलं आहे. त्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.

काय म्हटलं ट्विटमध्ये?

अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये मनातील भावना स्पष्ट केली आहे. आता सांगूनच टाकतो. वर्ल्ड कप 2026ची फ्रान्सची फुटबॉल टीम पाहा. द फ्रेंच. टीममध्ये 11 खेळाडू आहेत. 10 ब्लॅक आहेत आणि एक व्हाईट आहे. हीच ब्लॅकची ताकद आहे, असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

लोक भडकले…

अमिताभ यांच्या ट्विटवर लोक चंगलेच भडकले आहे. नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. फ्रान्सची टीम त्यांच्या रंगाने नव्हे तर त्यांच्या राष्ट्रीयतेने ओळखली जाते, अशा शब्दात नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांना फटकारलं आहे. तर काही लोकांनी अवाजवी आणि असंवेदनशील ट्विट म्हणून अमिताभ यांना फटकारलं आहे.

 

T 5794 -अब कहे देते हैं :
the French WC 2026 football team .. the FRENCH !!
11 players in team ..
10 Black .. !!
1 white !!?
the POWER of BLACK 💪 💪

— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 6, 2026

नेटकरी काय म्हणाले?

नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. फ्रान्स हा एक बहुसांस्कृतिक देश आहे. टीममध्ये काही खेळाडू आफ्रिकी आहेत. तर काही कैरेबियाई वंशाचे आहेत. पण त्यांचा जन्म आणि पालनपोषण हे फ्रान्समध्ये झालं आहे. त्यामुळे त्यांना रंगभेदातून पाहू नये. तर त्यांना केवळ आणि केवळ फ्रान्सचे खेळाडू म्हणूनच पाहा, असं एकाने म्हटलं आहे. तर, काही यूजर्सने त्यांना पाठिंबा दिला आहे. बिग बींच्या ट्विटचा अर्थ चुकीचा काढू नये, असं काही लोकांनी म्हटलं आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लता मंगेशकरांनी नाकारलं पण आशा भोसलेंनी दिला आवाज, घेतली 5 पट अधिक फी, गाणं बनलं सुपरहिट
  • पंतप्रधान मोदींना इंडोनेशियाचा सर्वोच्च पुरस्कार, ‘बिंटांग आदिपूर्णा रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया’ चा किताब, व्यापाराला नवीन दिशा, पूर्वेत भारताचा मोठा दबदबा
  • देवशयनी एकादशीनंतर 4 महिन्यांसाठी शुभ आणि मंगल कार्ये थांबणार,पुन्हा कधी होणार सुरू ?
  • Mumbai Rain Update : मुंबईत उधाणलेल्या समुद्रात अजब घडलं, अचानक समोर आलं गूढ जहाज, मध्ये नेमकं काय? सस्पेन्स वाढला!
  • संजू सॅमसनने स्वत:च पायावर मारून घेतला धोंडा? टीममधून वगळल्याच्या प्रकरणानंतर ट्वीस्ट

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in