• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता पुढच्या आंदोलनाची दिशा उद्धव ठाकरे ठरवणार, म्हणाले मी अभिजीतला फोन…, मोठी बातमी समोर

July 25, 2026 by admin Leave a Comment


राज्यात नीट पेपर फुटीनंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता. अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने सातत्याने नीट पेपर फुटी प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. यासाठी दिल्लीमधील जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं, तब्बल एक महिना हे आंदोलन सुरू होतं. आंदोलकांच्या वतीने संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला, अखेर दबाव वाढत असल्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असून, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख  उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

गेले काही दिवस आपला देश अस्वस्थ आहे. याचं कारण सर्वांना माहीत आहे. मला पहिल्या प्रथम अभिजीत दीपके आणि देशातील सर्व तरुणांचं साहजिकच कौतुक आहे. त्यांना न घाबरता समर्थन देणाऱ्या पालकांचं देखील अभिनंदन. या देशातील तरुणांनी भयाच्या छायेतून काढलं आहे. काही ना काही दबाव देशातील जनतेवर टाकला जात होता. जणू काही या देशात लोकं शिल्लक राहिले नाही, आहे ती झुरळं आहेत, या प्रमाणे लोकांना वागवलं जात होतं. एक मच्छर साला हा संवाद आठवला. एका झुरळाने या सरकारला झुकवलं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे. पुढच्या आंदोलनाची दिशा मी अभिजीतला सांगणार आहे. फोन लावतोय पण लागत नाही. जॅमर लागलं आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात येणार होता, परंतु त्याआधीच आता धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, त्यामुळे उद्या होणारा मोर्चा होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत होता, अखरे यावेळी बोलताना उद्याच्या मोर्चाबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठी अपडेट दिली आहे. उद्या मोर्चा होणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in