
अभिनेता आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या रिलेशनशिप आणि लग्नांबद्दल मोठे खुलासे करत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्या गर्लफ्रेंड गौरी हिच्यासोबत असलेलं रिलेशनशिप आणि रिना आणि किरण यांच्यासोबत झालेल्या घटस्फोटाबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. आमिर खान म्हणाला, ‘गौरी माझ्या आयुष्यात आल्यापासून मला माझं आयुष्य पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे…’ शिवाय मुलांबद्दल देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त आमिर खान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
गर्लफ्रेंड गौरी स्प्रेट हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल आमिर खान म्हणाला, ‘गौरी माझ्या आयुष्यात आहे, म्हणून स्वतःला भाग्यशाली समजत… गौरी खूप चांगली आहे… तिच्यासोबत असताना माझ्या मनाला शांती मिळते… पण माझी पूर्व पत्नी रिना आणि किरण यांच्यासोबत देखील माझं नातं घट्ट होतं. पण गोष्टी योग्य रित्या मार्गी लागल्या नाहीत. आता मला मला असं वाटतं गौरी माझ्या आयुष्यात आल्यामुळे मला खूप चांगलं वाटतं. आता कुठे मी पूर्ण झालो आहे… असं मला वाटतं.’ असं आमिर खान म्हणाला.
यावेळी खासगी आयुष्याबद्दल बोलताना अभिनेत्याने स्वतःच्या चुका देखील मान्य केल्या. ‘जवळच्या लोकांसोबत वेळ व्यक्तीत केला नाही. हिच माझी सर्वात मोठी चूक आहे… हिच चूक सुधारण्याची मी आता सुरुवात केली आहे. गेली 30-35 वर्षे मी फक्त काम, चित्रपट निर्मिती आणि अभिनयातच गुंतून गेलो होतो. कोविड महामारीच्या काळात मला माझ्या आयुष्याचं पुनर्मूल्यांकन करण्याची संधी मिळाली. त्या वेळी जेव्हा मला काम करता आले नाही, तेव्हा माझ्या लक्षात आले की मी खूप काही गमावले आहे आणि अशी वेळ पुन्हा कधीच येणार नाही.’ असं देखील अभिनेता म्हणाला.
आमिर खान याच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याचं पहिलं लग्न रिना दत्ता हिच्यासोबत झालं होतं. त्यांना आयरा आणि झुनैद अशी दोन मुलं देखील आहेत. तर आमिर याचं दुसरं लग्न किरण राव हिच्यासोबत झालं. दोघांना एक मुलगा आहे आणि त्याचं नाव आझाद असं आहे… आता अभिनेता गौरी हिला डेट करत आहे.
Leave a Reply