• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

बकरीच्या केसांनी उघडला खुनाच थरार… कसा तवडीत सापडला एका निष्पाप मुलीचा मारेकरी?

April 29, 2026 by admin Leave a Comment


गुन्हेगार कितीही हुशार असला तरी मागे एखादा पुरावा सोडतोच. गुन्हेगाराने मागे सोडलेला पुरावाच पोलिसांसाठी फार उपयोगी ठरला. राजधानीच्या शहरी भागात एका 10 वर्षांच्या मुलीच्या हत्येप्रकरणी अशीच एक घटना घडली. पुरावा नष्ट करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या मारेकऱ्यापर्यंत काही बकरीच्या केसांमुळे पोलीस पोहोचले. ही घटना राजधानीच्या बायपास पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जल्ला महावीर मंदिराच्या जवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी एका अरुंद गल्लीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ एका ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत 10 वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला. ती मुलगी घरून दूध आणायला निघाली होती, पण नंतर परत आलीच नाही. या घटनेनंतर परिसरात प्रचंड संताप उसळला आणि पोलिसांवर लवकरात लवकर प्रकरण उघडकीस आणण्याचा दबाव वाढत गेला.

पाटणा एसएसपी कार्तिकेय के. शर्मा यांनी सांगितल्यानुसार, तपासादरम्यान पोलिसांचं लक्ष त्या ब्लँकेटकडे गेलं ज्यात मृतदेह गुंडाळलेलं होता. कसून तपासणी केल्यावर त्या ब्लँकेटला बकरीचे केस चिकटलेले आढळले. पोलिसांनी अंदाज बांधला की, आरोपी याच परिसरात राहत असावा आणि त्याच्याकडे बकऱ्या असाव्यात.

गल्लीची झडती सुरू केली असता एका खोलीबाहेर चार-पाच बकऱ्या बांधलेल्या दिसल्या. त्या खोलीला बाहेरून कुलूप होतं. अशात पोलिसांना तेथे संशय आल्याने, त्यांनी घराचा कुलूप तोडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, आरोपी रंजीत लपून बसलेला पोलिसांना आढळला. आरोपीने बाहेरून कुलूप लावलं होतं आणि स्वतः आत पंख्याशिवाय बसला होता. घामाने त्याचं अंग भिजलं होतं, पण खिडकीतून तो पोलिसांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होता.

कडक चौकशीत रंजीतने गुन्हा कबूल केला. त्याने सांगितलं की, वाईट हेतूने मुलीला आपल्या खोलीत घेऊन गेला. मुलगी ओरडू लागल्यावर त्याने खोलीतील पाटा-वरवंट्याच्या दगडाने तिच्या डोक्यावर हल्ला केला आणि ती जागीच मृत्युमुखी पडली.
आरोपीने 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह दिवसभर पलंगाखाली लपवून ठेवलेला. रात्री सुमारे दोन वाजता मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून जवळच्या तलावात फेकायला निघाला. पण वाटेत पोलिसांची गस्त दिसल्याने घाबरून त्याने मृतदेह मध्येच कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ टाकला आणि पळ काढला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Godhra Election : राजकारणातली मोठी घटना, गुजरातच्या गोध्रामध्ये 100 टक्के मुस्लिम मतदार असलेल्या भागात हिंदू महिलेचा विजय
  • राकेश बापट ‘बिग बॉस मराठी 6’मधून बाहेर आल्यानंतर पूर्व पत्नी दुसऱ्या लग्नाबद्दल स्पष्टच म्हणाली..
  • Riyan Parag : लाईव्ह मॅचमधील त्या कृतीमुळे रियान पराग अडचणीत, RR च्या कॅप्टनवर होणार कारवाई ? नेमकं काय घडलं ?
  • तिची उंची 5 फूट, तरीही 3 फुटांवर… सिमरन पाटील मृत्यू प्रकरणाला थरारक वळण; हॉटेलमध्ये नक्की काय घडलं?
  • चीनचा समुद्रात हाहाकार! केला मोठा घात, शेजारी देशांना दणका, थेट युद्धनाैकाच..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in