• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Godhra Election : राजकारणातली मोठी घटना, गुजरातच्या गोध्रामध्ये 100 टक्के मुस्लिम मतदार असलेल्या भागात हिंदू महिलेचा विजय

April 29, 2026 by admin Leave a Comment


गुजरातमधील गोध्रा शहर हे देशभरात धार्मिक कारणांसाठी ओळखलं जातं. आजही ग्रोधाच्या आठवणी अनेकांच्या मनात ताज्या आहेत. याच गोध्रा शहरातून सामाजिक सलोख्याचा संदेश देणारी एक मोठी घटना घडली आहे. गुजरातच्या गोध्रा शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या. यात गोध्रा नगरपालिकेच्या वॉर्ड नंबर 7 मधून अपेक्षाबेन नैनेशभाई सोनी या अपक्ष हिंदू महिला उमेदवाराने दणदणीत मताधिक्क्याने विजय मिळवला. महत्वाचं म्हणजे अपेक्षाबेन गोध्राच्या ज्या 7 नंबर वॉर्डमधून जिंकल्या, तिथे 100 टक्के मुस्लिम मतदार आहेत.

गोध्रामध्ये 100 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या वॉर्डमध्ये एका हिंदू महिला उमेदवाराचा विजय ही दृष्टीकोन बदलणारी घटना आहे. महत्वाचं म्हणजे त्या वॉर्ड नंबर 7 च्या मतदारही नाहीत, तरीही त्यांनी मुस्लिम मतदारांचा विश्वास संपादन केला. जातीय आणि धार्मिक समीकरणांच्या पलीकडे जाऊन मुस्लिम मतदारांनी निर्णयाक भूमिका बजावल्यामुळे हा विजय शक्य झाला, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. ही गुजरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील एक मोठी घटना आहे.

निरीक्षकांचं म्हणणं काय?

धार्मिक बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याची गोध्राच्या राजकीय इतिहासातील ही दुर्मिळ घटना आहे. मुस्लिम मतदारांनी मोठ्या मताधिक्क्याने एका हिंदू महिला उमेदवाराला निवडून देणं यातून गोध्राच्या मतदारांनी धार्मिक विभागणीऐवजी व्यक्तीच्या कार्यक्षमतेला प्राधान्य देत असल्याचं दाखवून दिलं आहे. या ग्रोधा मॉडलची भविष्यात ग्रामीण भागात आणि अन्य गुजरातच्या नगरपालिकांमध्ये पुनरावृत्ती होईल असं निरीक्षकांचं म्हणणं आहे.

भाजपने किती महापालिका जिंकल्या?

गुजरातच्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचं एकहाती वर्चस्व दिसून आलं. भाजपने 15 महानगरपालिका जिंकल्या. एकट्या अहमदाबादमध्ये 192 पैकी 146 जागा जिंकल्या. काँग्रेसला फक्त 18 जागांवर समाधान मानावं लागलं. सूरतमध्ये भाजपने 115 जागा जिंकल्या. आम आदमी पार्टीला फक्त चार जागा मिळाल्या. राजकोट, वडोदरा या शहरांमध्ये सुद्धा हाच पॅटर्न पहायला मिळाला. त्या प्रत्येक महापालिका क्षेत्रात भाजपने 65 जागा जिंकल्या. काँग्रेसच्या दुहेरी आकडा गाठताना नाकीनऊ आले. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो.  मागच्या अनेक वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचं सरकार आहे.

 



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • झोपडपट्टीत गेलं बालपण, आज कोट्यवधींचा मालक; 26 वर्षांनंतर मराठमोळ्या अभिनेत्याने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न
  • अखेरच्या क्षणी स्मिता पाटील यांची अशी होती अवस्था; जवळच्या मैत्रिणीकडून खुलासा
  • मोठी बातमी! बापरे…राज्यात उष्माघाताचा धोका वाढला; तापमान वाढीसोबत पाणीटंचाईचीही झळ
  • Vidhan Parishad Election | राष्ट्रवादीतून विधान परिषदेत नेमकं कोण जाणार? राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर तटकरे लाईव्ह
  • मराठी माणूस थांबता कामा नये.. म्हणत हा अभिनेता मराठीसाठी थेट रस्त्यावर, म्हणाला, कुठेही MH 27 DK 0909 TATA हॅरिअर थांबवा आणि..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in