
नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे सध्या देशभरात वातावरण चांगलंच तापलं आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यासाठी गेल्या महिनाभरापासून कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमधील जंतर मंतर मैदानावर आंदोलन सुरू आहे. सीजेपीच्या वतीने संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता. दरम्यान यामुळे आता राष्ट्रीय टेस्टिंग एजेन्सी (NTA) च्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून आज रात्री आठ वाजता एक मोठी घोषण करण्यात येणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण मंत्रालयाकडून NTA मधील सुधारणांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आणि नवीन प्रणाली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. परीक्षेमध्ये पारदर्शकता आणि सुरक्षा यांची जबाबदारी निश्चित करण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल असणार आहे, असं बोललं जात आहे. मात्र अद्याप यासंदर्भातील मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Leave a Reply