• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आखाती देशात युद्धाचा भडका, अमेरिकेचा बॉम्बवर्षाव, इराणचंही चोख प्रत्युत्तर; भीषण हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू

July 14, 2026 by admin Leave a Comment


होर्मुजच्या सामुद्रधुनीवरून इराण आणि अमेरिकेत संघर्ष पेटला आहे. दोन्ही देश एकमेकांवर भीषण हल्ले करत आहेत. एकीकडे अमेरिका इराणवर बॉम्बवर्षाव करत आहे. तर इराण देखील अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहे. दोन्ही देशातील भीषण हल्ल्यात जहाजावर काम करणाऱ्या एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

इराणने होर्मुजच्या सामुद्रधुनीवरील एका जहाजावर हल्ला केला. या हल्ल्यात जहाजावर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. इराणने यूएईचा झेंडा असलेल्या जहाजावर हल्ला केला. इराणने मंगळवारी पहाटे होर्मुजच्या सामुद्रधुनीवर ओमानच्या हद्दीत दोन जहाजांना लक्ष्य केलं. ‘मोम्बासा’ आणि ‘बाहिया’ नावाच्या टँकर जहाजांवर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यात भारतीय नागरिकाच्या मृत्यूसह 8 जण गंभीर जखमी झाले.

मीडिया रिपोर्टनुसार, जहाजावर केलेल्या हल्ल्यात 6 भारतीत जखमी झाले. तर दोन युक्रेनचे नागरिक जखमी झाले. इराणने क्रूज मिसाइलने दोन जहाजांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही जहाजंचं मोठं नुकसान झालं आहे. बॉम्ब हल्ल्यामुळे जहाजाला आग देखील लागली. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन केल्याचे म्हणत यूएईने हल्ल्याचा निषेध केला आहे. आत्मसंरक्षणासाठी इराणला प्रत्युत्तर देऊ, असेही यूएईने म्हटले. या घटनेनंतर यूएईने अफवांपासून दूर राहण्याचेही आवाहन केलं आहे.

इराणच्या लष्करी तळावर हल्ला 

इराणचं म्हणणं आहे की, केवळ चुकीच्या दिशेने जाणाऱ्या जहाजांनाच लक्ष्य केलं जात आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीत अमेरिकन जहाजांना लक्ष्य केलं जात असल्याचे इराणच्या सरकारी टीव्ही चॅनलचा दावा आहे. अमेरिकेने इराणवर रविवारी आणि सोमवारी पहाटे बॉम्बवर्षाव केला. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकने इराणच्या 140 लष्करी तळावर हल्ला केला. यात कुवेत, कतार आणि यूएईचा समावेश आहे. अमेरिकेने इराणच्या अब्बास बंदर आणि केशम बेटांवरही हल्ला केला. इराणच्या एका वृत्तसंस्थेनुसार, पेट्रोलियम उद्योगासाठी प्रसिद्ध खुझेस्तान प्रांतातील शहांवर हल्ले केले जात आहे. अमेरिकेने होर्मुजजवळ असलेल्या बेटावरही बॉम्बहल्ला केला. यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in