• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47 ने गोळ्या झाडल्या, राहुल गांधींचा आरोप, खेडाही आक्रमक

July 27, 2026 by admin Leave a Comment


बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध एके-४७ (AK-47) चा वापर करण्यात आला; राहुल गांधींनी भाजप सरकारवर विद्यार्थ्यांबाबत ‘निर्घृण’ वागणूक दिल्याचा आरोप केला. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एके-47 मधून गोळीबार करण्यात आला, तर दिल्लीत आंदोलकांविरुद्ध पेलेट गन्सचा वापर करण्यात आला, असं त्यांनी म्हटलंय. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

विद्यार्थ्यांची अटक, एफआयआर आणि त्यांच्यावर झालेल्या कथित कारवाईचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विद्यार्थ्यांवरील कारवाई तात्काळ थांबवण्याची आणि या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वरील पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. “विद्यार्थ्यांविरोधात संपूर्ण व्यवस्था उभी करण्यात आली आहे. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 मधून गोळीबार झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. तसेच शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून एफआयआर दाखल करण्यात येत आहेत.” अस आरोप त्यांनी केला.

काय आहे राहुल गांधी यांचं ट्विट ?

“बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 ने गोळीबार करण्यात आला. शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्यावर एफआयआर दाखल केली जात असल्याची बातमी येत आहे. मोदीजी, विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल होणार नाही, हे तुमचं आश्वासन कुठे गेलं ? ” असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. बिहार असो की दिल्ली, प्रत्येक ठिकाणी एकच पद्धत दिसत आहे, हे सरकार खोटं आहे. सुधारणा करणं यांच्या आवाक्याबाहरेचं आहे. हे स्वत:च्याच शब्दांपासून मागे हटतील आणि प्रत्येक मार्गाने विद्यार्थ्यांचा आवाज दाबतील, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना प्रश्न विचारत विद्यार्थ्यांवर एफआयआर न करण्याचे आणि त्यांना मुक्त करण्याचे आश्वासन कुठे गेले, अशी विचारणा केली.

 

छात्रों के ख़िलाफ़ पूरा का पूरा सिस्टम ही जानलेवा है।

खबर आ रही है कि बिहार में प्रदर्शन कर रहे छात्रों पर AK-47 से गोलियाँ चलाई गई हैं और सैकड़ों छात्रों को गिरफ़्तार करके उनपर FIR की जा रही है।

मोदी जी, कहाँ गया आपका वादा कि छात्रों पर कोई FIR नहीं की जाएगी और उन्हें रिहा कर… https://t.co/c7zdyyeLA0

— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 27, 2026

पवन खेराही झाले आक्रमक

तर काँग्रेस नेते, राज्यसभा खासदार पवन खेरा हेही या मुद्यावरून आक्रमक झाले असून त्यांनी राहुल गांधी यांच ट्विट हे रिट्विट केलं. ” मोदी सरकारने देशातील तरूणांविरोधात युद्ध पुकारलं. विद्यार्थ्यांवर आधी पॅलेट गनने गोळीबार करण्यात आला, आता AK-47. आंदोलकाविरोधात कोणतीही सूडबुद्धीने कारवाई केली जाणार नाही, हे आश्वासनही केवळ एक ‘जुमला’ सिद्ध झालं आहे. हे एक अविश्वासू सरकार आहे, असह्य राज्यकर्ते आहेत”, असं म्हणत पवन खेरा यांनी सरकारवर हल्ला चढवला.

 

The Modi government has launched an open war against the youth of this country.

First, pellet guns were fired at them. Now, AK-47s.

And the promise of no witch-hunt against protesters has also proved to be no more than a jumla.

This is an unreliable government.

This is an… https://t.co/Ar6R4CWA5e

— Pawan Khera 🇮🇳 ಪವನ್ ಖೇರಾ (@Pawankhera) July 27, 2026



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने पाकिस्तानचा अणवस्त्र तळ किराना हिल्सवर हल्ला केलेला का? माजी CDS अनिल चौहान यांचा मोठा खुलासा
  • मुंबईतील कोस्टल रोड आणि वरळी-सी लिंकवर या वाहनांना कायमची बंदी? वाचा नवे निर्बंध
  • भारताला ज्याची भीती तेच धडले, मोठे नुकसान, थेट इराणसोबतच..
  • Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
  • मोठी बातमी! नागपूर हादरलं, काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in