• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

भारताला ज्याची भीती तेच धडले, मोठे नुकसान, थेट इराणसोबतच..

August 26, 2026 by admin Leave a Comment


इराण आणि अमेरिका युद्ध टोकाला पोहोचले होते. त्यानंतर अमेरिकेने इराणवरील हल्ले रोखले आहेत. मात्र, इराणला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे, इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशाला अमेरिका धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेने याला ऑपरेशन इकोनॉमिक आउटकास्ट नाव दिले. याच्या माध्यमातून त्यांच्याकडून इराणच्या आर्थिक ढाच्याला धक्का बसण्यासाठी प्रयत्न केली जात आहेत. आता अमेरिकेच्या या निर्णयाचा परिणाम भारतावरही होणार आहे. भारत अमेरिका इराण व्यापार संबंधांवर थेट परिणाम बघायला मिळेल. भारत इराणच्या मुख्य 5 मोठ्या व्यापारी देशांपैकी एक आहे. भारतातून वस्तू इराणमध्ये निर्यात होतात. यासोबतच शिपिंग, बॅंक आणि चाबहार प्रकल्पावर धोका निर्माण झाला.

भारताला चिंता आहे की, अमेरिकेच्या या निर्णयामुळे भारताच्या व्यापारावर थेट वाईट परिणाम होईल. आकडेवारीनुसार, 2025-26 दरम्यान भारत आणि इराणमध्ये व्यापार हा 14,483.81 कोटी राहिला. भारताने निर्यात 11,113.35 कोटी केली. आयात 3,325.45 कोटी राहिली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकेच्या या निर्णयामुळे अस्थिरता निर्माण होऊ शकते. जो देश इराणसोबत व्यापार करेल, त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

भारत इराणकडून फार जास्त कच्चे तेल खरेदी करत नाही. 2026 मध्ये विशेष घट बघायला मिळते. मुळात म्हणजे इराणी तेलाचे मोठा खरेदीदार चीन आहे. चीनचे 80 टक्के तेल इराणच्या मार्गे येते. अमेरिकेने लावलेल्या निर्बंधांमुळे मोठा दणका चीनला बसला. त्याचा परिणाम भारतावरही बघायला मिळेल. तुर्की देखील इराणचा मोठा भागीदार आहे. पाईपलाईनच्या माध्यमातून इराणमधून गॅस तुर्कीत दाखल होतो.

इराणसोबत व्यापारी संबंध असलेले सर्व देश संकटात सापडली आहेत. जर इराणसोबत व्यापार केला नाही तरीही समस्या आणि केले तर टॅरिफचे संकट. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, जर इराणसोबत कोणत्याही प्रकारचा व्यापार एखाद्या देशाने केले तर थेट त्या देशावर निर्बंध लावले जातील. भारत, चीन आणि तुर्की सारखे देश संकटात आलेत. त्यात भारत आणि चीनवरही टॅरिफ लावण्याच्या तयारीत अमेरिका आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं
  • Mohammed Shami : ‘तू फार्महाऊसवर वेश्या बोलावतो, मी तर…’, बायकोने मोहम्मद शमीवर पुन्हा उडवले शिंतोडे, पोस्ट चर्चेत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in