• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

असा कुठे बाप असतो का? मुलीच्या बदल्यात 93 लाखाचा फ्लॅट घेतला; बड्या अभिनेत्रीच्या नवऱ्याने…

July 31, 2026 by admin Leave a Comment


सध्या लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. अशातच राजा चौधरी आणि श्वेता तिवारी यांच्यातील घटस्फोटानंतर चर्चेत राहिलेल्या 93 लाख रुपयांच्या फ्लॅट प्रकरणावर आता राजा चौधरी पहिल्यांदाच सविस्तर भूमिका मांडली आहे. एका मुलाखतीत बोलताना त्याने श्वेता तिवारीने केलेले आरोप फेटाळून लावत त्यामागील आपली बाजू स्पष्ट केली.

श्वेता तिवारीने यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत दावा केला होता की, घटस्फोटाच्या वेळी तिने सुमारे 93 लाख रुपये किमतीचा 1 बीएचके फ्लॅट राजा चौधरीच्या नावावर केला. त्याबदल्यात राजाने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि मुलगी पलक तिवारीच्या कस्टडीवर दावा न करण्यास सहमती दर्शवली होती.

93 लाख रुपयांचा फ्लॅट का घेतला?

मात्र, राजा चौधरीने हा दावा वेगळ्या पद्धतीने मांडला. त्याच्या म्हणण्यानुसार, 2007 ते 2012 या काळात कौटुंबिक न्यायालयात खटला सुरू होता. या काळात तो प्रत्येक सुनावणीला हजर राहत होता पण श्वेता फार कमी वेळा न्यायालयात आली. तसेच न्यायालयाने मुलगी पलकला ठरावीक ठिकाणी भेटण्याची परवानगी दिली होती, मात्र श्वेताने कधीच तिला भेटण्यासाठी आणले नाही असा आरोपही त्याने केला.

राजाने पुढे सांगितले की, त्या काळात तो अनेक अडचणींना सामोरे जात होता. त्याला राहण्यासाठी घरही मिळत नव्हते. ज्या फ्लॅटचा उल्लेख केला जात आहे, तो मूळतः त्यांच्या लग्नावेळी त्याच्या वडिलांनी 9 लाख रुपयांना खरेदी केला होता. सुरुवातीचे डाउन पेमेंट वडिलांनी भरले होते तर नंतरचे ईएमआय त्याने आणि श्वेताने मिळून फेडले होते.

स्वतःचा त्याग दाखवण्याचा प्रयत्न केला

राजाच्या मते, त्याने हा फ्लॅट केवळ राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळावी म्हणून मागितला होता. मला संपत्ती किंवा इतर काही नको होते, फक्त शांततेत राहण्यासाठी एक घर हवे होते असे त्याने स्पष्ट केले. तसेच, श्वेताने सुरुवातीला सर्व अटी मान्य केल्या होत्या पण नंतर संपूर्ण प्रकरण वेगळ्या पद्धतीने मांडून स्वतःचा त्याग दाखवण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्याने केला.

दरम्यान, या प्रकरणावर श्वेता तिवारीकडून अद्याप कोणतीही नवीन प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांमुळे पुन्हा एकदा दोघांमधील जुना वाद चर्चेत आला आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 107 स्टोरी, 7,891 फॉलोअर्स; आता संगीता चांदगुडे यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटची चर्चा, अनेक पोस्ट एकाच विषयावर
  • तीन नवजात बालकांचा मृत्यू, आमदार रवी राणा यांचा डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप..
  • 86 हजार 622 कोटींचं बिल थकीत, कंत्राटदार आर्थिक अडचणीत; शिवतीर्थावर घेणार राज ठाकरेंची भेट
  • IND vs SL: यशस्वी जयस्वालचा माज खपवून घेतला जाणार नाही, भारतीय कोचकडून थेट वॉर्निंग
  • Drishyam 3: विजय साळगावकरचा शेवटचा डाव, अजय देवगणचा ‘दृश्यम: द कन्क्लुजन’; दोन भागांनी वाढवलेलं गूढ आता संपणार

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in