• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

असं एक गाव जिथे रहातात फक्त 10 च लोकं, पण 12 ऑगस्टच्या त्या स्पेशल रात्रीसाठी लाखो नागरिक या गावात पोहचणार

August 8, 2026 by admin Leave a Comment


ही गोष्ट आहे, उत्तर स्पेनमध्ये असलेल्या एका छोट्या गावाची, ज्याचं नाव आहे, अवेलोनोसा डे मुन्यो. हे गाव ओसाड आहे, या गावात कोणत्याच सुविधा नसल्याने एक एक करून या गावातील नागरिक आता दुसऱ्या गावात किंवा शहरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. या गावात आता फक्त दहा लोक राहतात. या गावात राहण्यासाठी एखादं चांगलं घर किंवा हॉटेल देखील नाहीये. मात्र सध्या हे गाव एका खास रात्रीची तयारी करत आहे. या रात्री संपूर्ण जगभरातून लोक या ठिकाणी येणार आहेत. या गवात पोहोचण्यासाठी जगभरातील लोकांमध्ये चढाओढ लागली आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडलाच असेल की एरव्ही एकही पर्यटक या गावाकडे फिरक नाही, मग आता या गावात असं नेमकं काय घडणार आहे की? जगभरातून लोक या गावात दाखल होणार आहेत? त्यामागे एक खास कारण आहे.

ते म्हणजे 12 ऑगस्ट 2026 या दिवशी अटलांटिक महासागरावरून एक खग्रास सूर्यग्रहण जाणार आहे. माद्रिद येथील भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मारिया तेरेसा लोपेझ सांचेझ यांनी दिलेल्या माहितीनुसार 1912 नंतर हे पहिलंच असं सूर्यग्रहण आहे, जे संपूर्ण सूर्यग्रहण स्पेनच्या मुख्य भूभागावरून दिसणार आहे, आणि हे सूर्य ग्रहण जिथे दिसणार आहे, त्याच वाटेवर अवेलोनोसा डे मुन्यो हे गाव आहे. हे सूर्य ग्रहण सूर्यास्ताच्या काही वेळ आधी दिसणार आहे, या काळात हे संपूर्ण गाव अंधारामध्ये बुडणार आहेत. म्हणजे त्यावेळी इथे जे लोक उपस्थित असणार आहेत, ते एकाच दिवसात दोनदा सूर्यास्ताचा अनुभव घेणार आहेत.

हा नजारा अनुभवण्यासाठी आता जगभरातून लोक या गावात दाखल होणार आहेत. विशेष म्हणजे खग्रास सूर्यग्रहनानंतर याच दिवशी या गावात उपस्थित असलेल्या लोकांना त्याच रात्री पर्सिड उल्कावर्षाव देखील अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे या दोन निसर्ग चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी लोक या गावात 12 ऑगस्टच्या रात्री गर्दी करणार आहेत. गावातील लोकांनी देखील पाहुण्यांच्या आगमनाची तयारी सुरू केली आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एअरपोर्टवर अमित शाह अन् एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात दहा मिनिट चर्चा, शिंदेंना मिळालं मोठं आश्वासन
  • सलमान खानच्या या व्हिडीओने जिंकले लोकांचे मन, तो व्हिडीओ व्हायरल होताच काैतुक, भिंतीवर..
  • Mohan Bhagwat : आज रात्री मोहन भागवत प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर येथून करणार संबोधित
  • तिला एअर अ‍ॅम्ब्युलन्समधून नागपुरात आणा… महिलेची काठमांडूत बिघडली तब्येत; कुटुंबीयांचा फडणीस, गडकरींकडे टाहो
  • सुष्मिता सेनच्या दत्तक मुलीचं हटके ट्रान्सफॉर्मेशन, ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा, अभिनेत्रीने शेअर केलेत फोटो

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in