• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अशी असभ्य टिप्पणी… पीएम मोदीविषयींचे ते शब्द, राहुल गांधी यांच्यावर भडकले राजनाथ सिंह, काँग्रेसला खणखणीत उत्तर

August 14, 2026 by admin Leave a Comment


संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केला. काल काँग्रेसच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. पाकिस्तानने मध्यस्थीची मिळवलेली संधी, पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण तर दुसरीकडे चीनने भारताची भूमी बळकावल्याचा दावा यातून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्याचवेळी संदीप दीक्षित यांची गळाभेट घेताना जो संवाद झाला. त्यावरून राहुल गांधी यांच्यावर भाजप पेटून उठला आहे.

त्यांची टिप्पणी अत्यंत असभ्य

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांच्यावरील टिप्पणी अत्यंत असभ्य आणि लज्जास्पद आहे. ज्यांच्या नावासमोर गांधी हे अडनाव आहे, त्यांची वर्तणूक अशी असेल अशी मी कल्पनाही केली नव्हती, असी टीका त्यांनी केली. गांधी अडनाव लावलेले असताना ते असे लज्जास्पद वक्तव्य करत असल्याची टीका त्यांनी केली.

VIDEO | Delhi: Reacting to Lok Sabha LoP Rahul Gandhi’s remarks on foreign policy, Union Defence Minister Rajnath Singh (@rajnathsingh) says, “The comments made regarding India’s foreign policy are not only extremely low-level and condemnable, but I also find them personally very… pic.twitter.com/fVE4ZtcLto

— Press Trust of India (@PTI_News) August 14, 2026

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पीएम मोदी यांच्यावर आणि भारताच्या परराष्ट्र धोरणावर टिप्पणी केली. ती अत्यंत खालच्या दर्जाची आणि निंदाजनक होती. या टिप्पणीने मलाही मोठा धक्का बसला. कारण माझ्या इतक्या दीर्घकालीन राजकीय जीवनात मी अशाप्रकारचा विरोधी पक्षनेता पाहिला नाही. त्यांचे वर्तन चुकीचे असल्याचा दावा राजनाथ सिंह यांनी केला. सुषमा स्वराज, अरूण जेटली, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी असो की सोनिया गांधी, मनमोहन सिंह हे सुद्धा विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी कधी अशा भाषेचा वापर केला नसल्याचे सिंह म्हणाले.

गळाभेट हा परराष्ट्र धोरणाचाच भाग वाटतो

दिल्लीतील रचनात्मक काँग्रेसच्या अधिवेशनात गुरुवारी राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले होते. गळाभेट हेच परराष्ट्र धोरण असल्याचे मोदी यांना वाटत असल्याचा चिमटा लोकसभा विरोधी पक्षनेत्यांनी काढला होता. जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजीनामा देत नाहीत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे पायउतार होत नाही, तोपर्यंत विरोधकांचा लढा सुरूच राहील असे सांगायला राहुल गांधी विसरले नाहीत. हा लढा प्रेमाने लढवण्यात येईल, द्वेषाने नाही असे ते म्हणाले. देशातील अनेक लोक अद्यापही भाजप आणि संघाला घाबरत असल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला होता.  कालच्या एकूणच प्रकारामुळे देशभरात वातावरण तापले आहे. राहुल गांधींवर भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • भाऊ आम्हाला माफ कर रे, कुणालच्या मावस बहिणीने अखेर मन मोकळं केलं, सगळं सांगून टाकलं!
  • MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
  • आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
  • नेपाळमध्ये प्रलय… दुसरीकडे चीनचं अख्खं शहर बुडालं, विध्वंसाचा धडकी भरवणारा व्हिडिओ पहाच

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in