
कलर्स टीव्हीवरील अत्यंत लोकप्रिय रिअॅलिटी शो 'लाफ्टर शेफ्स'च्या तिसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. अली गोणी आणि जन्नत झुबैर यांच्या जोडीने यंदाच्या सिझनमध्ये बाजी मारली आहे. हे दोघंही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून दोघं टीव्ही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. सोशल मीडियावरही या दोघांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.
अली गोणीने 2012 मध्ये 'एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला 5'मधून करिअरची सुरुवात केली होती. मात्र 2013 मध्ये स्टार प्लसच्या 'ये है मोहब्बतें' या मालिकेतून त्याला खरी ओळख मिळाली. त्यानंतर 2020 मध्ये 'बिग बॉस 14'हा शो त्याच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला होता. या पोमध्ये त्याने वाइल्ड कार्ड एण्ट्री केली होती.
अली गोणीने 'ये है मोहब्बतें', 'कुछ तो है तेरे मेरे दरमियाँ', 'ये वादा रहा', 'नागिन 3' आणि 'दिल ही तो है' यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली आहे. याशिवाय त्याने 'फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 9', 'नच बलिए 9', 'बिग बॉस 14' या शोजमध्येही काम केलंय. लाफ्टर शेफ्सनंतर तो आता 'अलायन्स'चाही भाग बनला आहे.
2001 मध्ये जन्मलेल्या जन्नतने 2008 मध्ये 'चांद के पार चलो' या मालिकेत बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ती 'दिल मिल गए' आणि 'काशी- अब ना रहे कोरा कागज तेरा'मध्ये झळकली. 2011 मध्ये 'फुलवा' या मालिकेतून तिला खरी लोकप्रियता मिळाली. या मालिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा पुरस्कार मिळाला होता.
मिडिया रिपोर्ट्सनुसार, जन्नतकडे तब्बल 250 कोटी रुपयांची संपत्ती आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 51.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म्समधून तिची चांगली कमाई होते. मिळालेल्या माहितीनुसार, एका एपिसोडसाठी ती जवळपास 18 ते 20 लाख रुपये मानधन घेते.
'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, अली गोणीची संपत्ती जवळपास 15 ते 25 कोटी रुपयांदरम्यान आहे. ब्रँड्सच्या जाहिराती, सोशल मिडिया आणि शोजमधून त्याची सर्वाधिक कमाई होते.






Leave a Reply