• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अर्ध्या रात्री तिच्या घराचा दरवाजा उघडला अन्.., अरविंद केजरीवालांनी सांगितली सुनीता यांच्यासोबतची लव्हस्टोरी

August 13, 2026 by admin Leave a Comment


आम आदमी पार्टीचे संस्थापक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीमध्ये बोलताना विविध विषयांवर चर्चा केली आहे. त्यांनी आपल्या खासगी आयुष्यातील देखील काही प्रसंग या मुलाखतीमध्ये सांगितले आहेत. तसेच देशात सध्या असलेल्या राजकीय परिस्थितीवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. तसेच मी जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजला होतो, तेव्हा माझ्यासोबत देखील रॅगिंग झालं होतं, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला आहे. त्यांनी असाच आपल्या आयुष्यातील एक प्रसंग यावेळी सांगितला.

जेव्हा मी इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होतो तेव्हा मी घरी आल्यानंतर मला माझ्या आजोबांनी विचारलं तू नेमका कशाचा अभ्यास करत आहेस, तेव्हा मी सांगितलं की, मी मेकॅनिकल अभियांत्रिकीचा अभ्यास करत आहे, तेव्हा माझे आजोबा मला म्हणाले की पंखा खराब झाला आहे, तेवढा तो दुरूस्त करून दे, त्यावेळी मला माझ्या आजोबांच्या बोलण्यावर हसू आलं, जसं आज सध्या संपूर्ण जगभरात एआयचा डंका आहे, तसंच त्या काळात कम्प्युटरची चलती होती, लोकांना भीती वाटायची की कम्प्युटर आपल्या नोकऱ्या खाऊन टाकेल, असंही यावेळी केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

तसेच त्यांनी यावेळी आपली लव्हस्टोरी देखील शेअर केली आहे. ‘आयआरएस इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस’ ट्रेनिंग वेळी माझी नागपुरात सुनीता यांच्यासोबत ओळख झाली होती. त्या माझ्या बॅचमेंट होत्या. एक दिवस मी अर्ध्यारात्री जाऊन सुनीता यांचा दरवाजा वाजवला, त्यांनी जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा मी क्षणाचाही विलंब न लावता त्यांना थेट विचारून टाकलं की विल यू मॅरी मी, तेव्हा सुनीता यांनी केजरीवाल यांना सांगितलं की मी तुम्हाला नंतर सांगते. त्यानंतर त्यांनी या संदर्भात आपल्या कुटुंबाला माहिती दिली, कुटुंबाने लग्नाला परवानगी दिल्यानंतर त्यांनी देखील मला होकार दिला आणि आमचं लग्न झालं असा किस्सा या पॉडकास्टमध्ये अरविंद केजरीवाल यांनी सांगितला आहे. यावेळी त्यांनि विविध विषयांवर चर्चा केली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IND vs SL: पाचव्या दिवशी टीम इंडियाचा विजयाचं स्वप्न भंगणार का? हातातला सामना ड्रॉ होण्याची भीती!
  • सोशल मीडियावर ‘झुठ की गुंज’ संकेतस्थळाची चर्चा, राहुल गांधींचे दावे चुकीचे दावा
  • Kriti Sanon : फिल्मी पडद्यावरच नाही, कमाईतही ‘हिट’; क्रिती सेननची कमाई नेमकी किती? संपत्तीचा आकडा थक्क करणारा
  • सून बायसेक्शुअल असल्याचं कळल्यावर गौरव खन्नाच्या आई-वडिलांनी काय केलं? आकांक्षा चमोला म्हणाली…
  • रूपाली चाकणकरांच्या रेस्टॉरंटमध्ये डान्सबार, हुक्का पार्लर… रुपाली ठोंबरेंचे खळबळजनक आरोप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in