• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अमिताभ बच्चन यांच्यासोबत होते खासगी संबंध? रेखा सर्वांसमोर म्हणालेल्या, ‘हा का मुर्खांसारखा प्रश्न, मी आजपर्यंत…’

July 25, 2026 by admin Leave a Comment


Rekha – Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या नात्याबद्दल कोणाला माहिती नाही कोणीच नाही. एक काळ असा होता जेव्हा फक्त बॉलिवूड नाही तर, चाहत्यांमध्ये देखील रेखा आणि बिग बी यांच्या नात्याची चर्चा रंगलेली. पण दोघांचं नात कधीच लग्नापर्यंत पोहोचलं नाही. कारण तेव्हा बिग बी यांचं लग्न अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत झालं होतं. अशात बिग बी यांनी कुटुंबाला प्राधान्य देत, रेखा यांच्यासोबत असलेलं त्यांचं नातं संपवलं… असं देखील सांगितलं जातं. पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांचं खरंच खासगी संबंध होते का? यावर खुद्द रेखा यांनी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं…

सांगायचं झालं तर, एका मुलाखतीत रेखा यांना विचारण्यात आलं, ‘अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना कधी त्यांच्यावर प्रेम झालं.? यावर रेखा म्हणालेल्या ‘हा काय मुर्खासारखा प्रश्न आहे… मी आजपर्यंत अशी कोणती महिला, पुरुष किंवा लहान मुलांना भेटली नाही… जे अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करत नाही… प्रत्येक जण बिग बींवर प्रेम करतं…’, आजही अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या फआर मोठी आहे…

यानंतर रेखा यांनी आणखी एका मुलाखतीत मोठा खुलासा केलेला… रेखा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेल्या सर्व नात्याला नकार दिला… रेखा म्हणालेल्या, ‘माझं कधीच अमिताभ बच्चन यांच्यासोबत खासगी संबंध नव्हते. रंगणाऱ्या चर्चा फक्त आणि फक्त अफवा आहेत… अमिताभ बच्चन यांच्यावर मी कधी प्रेमिका म्हणून प्रेम केलं नाही. एक चाहती म्हणूनच मी त्यांच्यावर प्रेम केलं’ असं देखील रेखा म्हणाल्या होत्या.

दोघांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, आज बिग बी त्यांच्या कुटुंबियांसोबत आनंदाने जगत आहेत, पण रेखा आजही एकट्याच आहेत.  असं  नाही की, रेखा यांच्या आयुष्यात कधी प्रेमाची एन्ट्री झालीच नाही. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत रेखा यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर रेख यांनी उद्योजकासोबत लग्न केलं. पण लग्नाच्या 6 महिन्यात त्यांच्या पती आत्महत्या केली. त्यानंतर रेखा यांनी कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही.

 

 

 

 

 



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in