• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अभिनेत्री शबाना आजमी यांना स्वाईन फ्ल्यूची लागण, डॉक्टरांकडून बेड रेस्टचा सल्ला

July 25, 2026 by admin Leave a Comment


ज्येष्ठ अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांना स्वाइन फ्लू (H1N1) झाल्याचे समोर आले आहे. स्वतः शबाना आझमी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती चाहत्यांना दिली. डॉक्टरांनी त्यांना पुढील पाच दिवस पूर्ण बेड रेस्ट आणि आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिल्याने त्यांनी नियोजित सर्व सार्वजनिक कार्यक्रम पुढे ढकलले आहेत.

शबाना आझमी या नुकत्याच दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिल्या होत्या. विविध सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर त्या नेहमी आपली भूमिका मांडत असतात. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि वैद्यकीय तपासणीत त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले.

शबाना आझमींची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट

यामुळे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होणे त्यांना शक्य होणार नाही असं स्वत: त्यांनी इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर करत सांगितले. तसेच आपल्या अनुपस्थितीबद्दल त्यांनी खेद देखील व्यक्त केला.

पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं की, ‘माझ्या प्रिय मुंबईकरांनो, मला उद्या तुमच्यासोबत आंदोलनात सहभागी व्हायचे होते. मात्र मला H1N1 (स्वाइन फ्लू) झाला असून पुढील पाच दिवस मला आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. मी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसले तरी माझा पूर्ण पाठिंबा आणि शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. अनेक युवक-युवती प्रथमच एखाद्या आंदोलनात सहभागी झाले असून त्यांनी आपल्या आवाजाचे महत्त्व अनुभवले आहे.

कवितेद्वारे युवकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न

तुमचे धैर्य, जिद्द आणि निर्धार मला सतत प्रेरणा देत आहेत. मी पूर्णपणे तुमच्या पाठीशी उभी आहे असेही त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले. यासोबतच शबाना आझमी यांनी त्यांचे वडील आणि प्रसिद्ध कवी कैफी आझमी यांनी तरुणांसाठी लिहिलेली ‘नौजवान’ ही कविता देखील शेअर केली. या कवितेद्वारे त्यांनी युवकांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shabana Azmi (@azmishabana18)

शबाना आझमी यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या उत्तम प्रकृतीसाठी प्रार्थना केल्या जात असून त्या लवकरच पुन्हा आपल्या कामात आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय होतील अशी अपेक्षा देखील चाहत्यांनी व्यक्त केली आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in