• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अनुपम खेर यांची ‘जेन-झी’ स्टाइल Reel तुफान व्हायरल; 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज

August 4, 2026 by admin Leave a Comment


इन्स्टाग्रामवर ‘रील्स’ बनवण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. कोविड महामारीच्या काळात इन्फ्लुएन्सर मिस्टर फैजूने ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ या गाण्यावर एक रील बनवली होती, जी सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली होती. याच रीलमुळे फैजू सोशल मीडिया स्टार बनला होता. नंतर या गाण्यावर रील्स बनवण्याचा एक ट्रेंडच सुरू झाला होता. त्यानंतर आता नीट पेपरफुटीप्रकरणी जेन-झींच्या आंदोलनादरम्यान याच गाण्यावर पुन्हा एकदा काही इन्फ्लुएन्सर्स रील्स बनवू लागले. रीक्रिएट केलेले हे रील्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. या गाण्यावर रील बनवण्याचा मोह आता ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनाही आवरला नाही. त्यांनी सहकलाकार आणि मित्र बमन इराणी, रणवीर शौरी, परवीन डबाव यांच्यासोबत मिळून भन्नाट रील बनवली आहे.

अनुपम खेर यांचा ‘खोसला का घोसला 2’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील सहकलाकारांसोबत त्यांनी ही रील बनवली आहे. बमन इराणी, रणवीर शौरी आणि परवीन डबाव यांच्यासोबत मिळून त्यांनी ‘मेरे मेहबूब कयामत होगी’ या गाण्यावर रील बनवत अनुपम खेर यांनी ट्रेंडला फॉलो केलं आहे. ही रील इतकी भन्नाट आहे की अवघ्या काही तासांत ती इंटरनेटवर तुफान व्हायरल झाली आणि त्याला 100 मिलियन म्हणजेच 100 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

पहा रील-

 

View this post on Instagram

 

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

या रीलला मिळत असलेला जबरदस्त प्रतिसाद पाहून रणवीर शौरीने एक्स अकाऊंटवर अनुपम खेर यांचे आभार मानले आहेत. ‘आम्हाला 100 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूजच्या क्लबमध्ये आणल्याबद्दल धन्यवाद’, अशी पोस्ट रणवीरने अनुपम खेर यांच्यासाठी लिहिली आहे. ही रील शेअर करताना अनुपम खेर यांनी मजेशीर कॅप्शनसुद्धा लिहिलं आहे. ‘खोसला आणि खुराना यांचं कधीच पटलं नाही, इथेसुद्धा नाही. जय हो!’

‘खोसला का घोसला 2’ हा चित्रपट 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि गाजलेल्या ‘खोसला का घोसला’चा सीक्वेल आहे. या आगामी चित्रपटात पहिल्या चित्रपटातील मूळ कलाकारांसोबत काही नवीन चेहरेसुद्धा आहेत. प्रशांत बांगिया यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये अनुपम खेर, बमन इराणी, रणवीर शौरी, प्रवीण डबास, तारा शर्मा आणि किरण जुनेजा यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या 28 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बुलढाणा : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप..
  • तुकाराम मुंढेंचा दणका! 37 हॉटेल्सवर धाडी, 4 आस्थापनांचे परवाने निलंबित, संपूर्ण राज्यात खळबळ
  • 99 टक्के लोकांना माहिती नाही बेडवरची गादी किती वर्षांनी बदलावी?
  • पुढचे 17 तास धोक्याचे… 23 राज्यांवर मोठं संकट, 80च्या स्पीडने… IMD ची मोठी अपडेट काय?
  • फोटो, इमेज आणि पिक्चर याचा अर्थ एकच होतो का? तुम्हालाही तसंच वाटतंय का? जाणून घ्या तिन्हींमधला फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in