• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अनाया बांगरला महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी दिल्याने दिग्गज क्रिकेटपटू भडकली, निर्णबाबत थेट म्हणाली..

August 28, 2026 by admin Leave a Comment


भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांच्या मुलील ऑस्ट्रेलियात महिला क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनाया बांगर प्रचंड खूश आहे. लिंग बदल केल्यानंतर तिच्या क्रिकेट खेळण्याच्या स्वप्नांना ब्रेक लागला होता. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खेळण्यासाठी हिरवा कंदील दाखवल्याने तिने आनंद व्यक्त केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयानंतर पुढच्या वर्षी क्रिकेट खेळेल असं तिने जाहीरपणे सांगितलं. यासाठी तिला 12 महिने टेस्टोस्टेरॉन मेंटेन ठेवावी लागणार आहे. त्यासाठी तिला खूपच काळजी घ्यावी लागणार आहे. यासाठी तिने तयारीही दर्शवली आहे. असं असताना तिचं स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच दिग्गज महिला क्रिकेटपटूने खो घातला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या निर्णयावर आता वादाला फोडणी मिळाली आहे. दक्षिण अफ्रिकेची दिग्गज अष्टपैलू खेळाडू मारिजन कापने या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. तसेच हा निर्णय मागे घेण्याची अपील केली आहे.

महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर किंवा मेल प्यूबर्टीसह जन्माला आलेल्या खेळाडूंना खेळवण्यावरून वाद सुरू आहे. असं असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाची पॉलिसी वेगळी आहे. त्यांनी अटी शर्थींची पूर्तता केल्यानंतर महिला क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली आहे. यावर दक्षिण अफ्रिकेची स्टार क्रिकेटपटू मारिजन कापने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे. मारिजन कापने लिहिलं की, ‘हे पूर्णपणे चुकीचं आहे, याला परवानगी दिली जाऊ नये.’ यासह तिने ही पोस्ट वुमन्स बिग बॅश लीग स्पर्धेला टॅग केली आहे. तसेच या पोस्टमध्ये अनाया बांगर क्रिकेट खेळताना दिसत आहे.

Marizanne Kapp’s Instagram story on Anaya Bangar. pic.twitter.com/ofbDpVXYPi

— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 28, 2026

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमावलीनुसार, महिला क्रिकेट खेळण्यासाठी रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी सलग किमान 12 महिने 10 नॅनोमोलक्षा कमी राहिली पाहिजे. अनायाने जुलैमध्ये केलेल्या तिच्या सर्वात अलीकडील रक्त तपासणीत एकूण टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण 0.6 नॅनोमोल नोंदवले गेले. आता तिला ही पातळी 12 महिने कायम ठेवावी लागणार आहे. मार्च 2027 पर्यंत अनायाने धोरणातील अटींची पूर्तता केल्यास तिला खेळण्याची परवानगी मिळेल.

#WATCH | Mumbai, Maharashtra: On making a comeback in cricket, Anaya Bangar, a cricketer and the daughter of former Indian international cricketer and national batting coach, Sanjay Bangar, said, “…I am preparing to return to women’s cricket in Australia with the aim of… pic.twitter.com/NVgrICOjgT

— ANI (@ANI) August 27, 2026

अनाया बांगरने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या परवानगीनंतर सांगितलं की, ‘“मला अगदी स्पष्टपणे सांगायचं आहे की, पात्रता म्हणजे निवड नव्हे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मला एक मार्ग दाखवला आहे, पण याचा अर्थ असा नाही की मला संघात स्थान मिळाले आहे. मला अजून सराव करावा लागेल, स्पर्धा करावी लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल आणि ती संधी मिळवावी लागेल.’





Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अमेरिकेत भारतासारखं वोटर कार्ड नसतं? मग मतदान कसं करतात, जाणून घ्या
  • CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
  • LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश
  • ‘आमच्या उपोषणावर सरकारच.. पण,आमच्या मुलांना त्रास द्यायचा नाही,’ काय म्हणाले मनोज जरांगे ?
  • NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in