• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अत्यंत विचित्र दुर्घटना! लिफ्ट न येताच दरवाजा उघडला, मुलगा कोसळताच स्फोट… कुर्ल्यातील थरारक घटना

July 8, 2026 by admin Leave a Comment


कुर्ल्यात अत्यंत धक्कादायक आणि विचित्र दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. तसेच अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत. लिफ्ट न येताच लिफ्टचा दरवाजा उघडल्याने एका मुलाचा तोल गेला आणि तो पडला. त्यामुळे विजेचा जबर धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अत्यंत थरारक अशी ही घटना आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं आणि दहशतीचं वातावरण झालं आहे. या प्रकाराला जबाबदार कोण? असा सवाल आता केला जात आहे.

नेहरू नगरच्या शमीम टॉवरमधील ही धक्कादायक घटना आहे. 12 वर्षाचा जमीर नावाचा मुलगा हा इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून थेट लिफ्टच्या डक्टमध्ये (शाफ्टमध्ये) पडल्याने जखमी झाला होता. तो तिथे खेळत असताना ही दुर्घटना घडली. या हृदयद्रावक अपघातात गंभीर जखमी झालेल्या जमीरचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सोसायटीच्या देखभालीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

थेट अंधाऱ्या डक्टमध्ये…

स्थानिक नेहरू नगर पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (ADR) नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, 12 वर्षांचा जमीर शेख सोमवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास 10 व्या मजल्यावर एका मित्रासोबत खेळत होता. तो लिफ्टच्या बाहेरील दारावर हात ठेवून उभा होता. मात्र अचानक लिफ्ट न येताच बाहेरचा सुरक्षा दरवाजा उघडला. जमीरचा तोल गेला आणि तो थेट अंधाऱ्या डक्टमध्ये पडला. त्यावेळी स्फोटाचा प्रचंड आवाज आल्याने लोक घाबरले आणि घराच्या बाहेर पडले. तेव्हा लिफ्टमधून धूर येत असल्याचं दिसून आलं आणि समोर जो प्रकार पाहिला त्याने सर्वच हादरल्याचं सूत्रांनी सांगितलं.

त्याला वाचवता आलं नाही

अपघात झाला तेव्हा लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर थांबलेली होती. त्यामुळे जमीर दहाव्या मजल्यावरून थेट लिफ्टच्या छतावर पडला. जमीरचा विजेशी संपर्क आल्याने स्फोटाचा मोठा आवाज झाला. त्यामुळे सर्वच हादरले. स्फोटाचा आवाज ऐकून रहिवासी घटनास्थळी धावून आले. जेव्हा त्यांच्या लक्षात आले की मूल लिफ्टमधून खाली पडलं आहे, तेव्हा एकच गोंधळ उडाला. लोकांनी रक्तबंबाळ आणि गंभीर अवस्थेत असलेल्या जमीरला पटकन बाहेर काढले. त्याला तात्काळ जवळच्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही. या संदर्भात पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; FDA भरती परीक्षा रद्द, नेमकं काय घडलं?
  • वैभव सूर्यवंशीला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला पाहिजे…थेट BCCI अन् ICC कडे केली तक्रार, असं का?
  • इस्लामची पुस्तके वाचा, नाहीतर मुलाला दहशतवाद्यांना विकून टाकेन… तिघांच्या मृत्यूनंतर कोचचे काळे कृत्य उघड
  • Sugar price hike : मोठा निर्णय! 5 किलोपेक्षा अधिक साखर मिळणार नाही, डी मार्ट, बिगबास्केट आणि ब्लिंकिट… कंपन्यांनी बंदी का घातली?
  • कंत्राटदार संघटनेचा सरकारला मोठा इशारा, मुंबईतील कंत्राटदाराने वैतागून संपवली जीवनयात्रा..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in