• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अजितदादा माझ्या वाढदिवशी आले आणि…, सयाजी शिंदेंनी ‘ती’ खास भेट आजही ठेवलीये जपून

July 17, 2026 by admin Leave a Comment


दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी फक्त मराठीच नाही तर, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील मोठी कामगिरी केली. आज सयाजी शिंदे यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. सयाजी शिंदे फक्त त्यांच्या अभिनेयामुळेच नाही तर, अनेक विषयावर स्वतःचं परखड मत देखील मांडतात. ज्यामुळे देखील सयाजी शिंदे चर्चेत असतात. एवढंच नाही तर, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत देखील सयाजी शिंदे यांची खास मैत्री होती. अजिद दादांनी दिलेली एक खास भेट आजही सयाजी शिंदे यांनी जपून ठेवली आहे. त्या भेटीबद्दल सयाजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं असून, ते सध्या  चर्चेत आहे.

सांगायचं झालं तर, नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्यासोबत असलेल्या मैत्रीबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. नुकताच झालेल्या मुलाखतीत सयाजी शिंदे म्हणाले, ‘माझ्या वाढदिवशी अजितदादा आले होते. त्यांनी मला विठ्ठलाची मुर्ती भेट दिली. त्या प्रेमापोटी मी ती भेट आजही जपून ठेवली आहे..’

पुढे सयाजी शिंदे म्हणाले, ‘विठोबा हा असा देव आहे, जो प्रत्येकाच्या मनात आहे… विठ्ठल शेतात आहे, निसर्गात आहे, झाडांमध्ये आहे… विठ्ठल सर्वत्र अनुभवता येतो. तोच खरा विठोबा आहे. विठ्ठल – रुक्मिणी हे आदर्श आणि संस्काराचं प्रतीक आहे …’ असं देखील सयाजी शिंदे म्हणाले. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सयाजी शिंदे यांची चर्चा सुरु आहे.

अजित पवार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडालेली. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी अजित पवार बारामतीत एकूण चार प्रचारसभा घेणार होते. परंतु बारामतीच्या विमानतळावर लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचं निधन झालं. अजितदादांच्या अंत्यसंस्काराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हेदेखील उपस्थित राहणार आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पॅनिक अटॅकची समस्या सतावतेय, धोका कमी करण्यासाठी या 5 सोप्या सवयी ठरतील महत्त्वाच्या
  • Kiara Advani: टॅक्सिक फेम कियाराचा कातिल अंदाज, फोटो पाहून चुकेल काळजाचा ठोका
  • Mulshi Pattern 2: मुळशीची बदनामी करून मोठे झाले, पैसा कमावला..; प्रवीण तरडेंवर मुळशीकरांचा आरोप, ‘मुळशी पॅटर्न 2’च्या नावाला विरोध
  • Vastu Tips : घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावताय? या दिशेला बिलकूल लावू नका
  • पाकिस्तान महिला क्रिकेटची वेगवान गोलंदाज आयमन अन्वरची निवृत्ती, कारण की..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in