• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अजय देवगणच्या लेकाचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; 15 वर्षांच्या युगचा फिटनेस पाहून नेटकरी थक्क!

June 7, 2026 by admin Leave a Comment


अजय देवगण आणि काजोल यांचा मुलगा युग सध्या त्याच्या जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे. युग आता 15 वर्षांचा झाला आणि त्याचं फिटनेस पाहून हे स्पष्ट दिसून येत आहे की तो त्याच्या आजोबा आणि वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकतोय. सध्या सोशल मीडियावर युग देवगणचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तो जिममध्ये वर्कआऊट करताना दिसत आहे. या वर्कआऊटची सुरुवात कशी झाली आणि त्यानंतर त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं, हे यात पहायला मिळतंय. अजय देवगणच्या लाडक्या लेकाचा हा व्हिडीओ शेअर करत सांगितलं गेलंय की तो जिममध्ये सर्वांत मेहनती मुलगा आहे. त्याची सुरुवातीची आणि आताची झलक पाहून, ही गोष्ट सहज स्पष्ट होत आहे.

या व्हिडीओमध्ये युग जिममध्ये पुश-अप्स करताना दिसत आहे. व्हिडीओची सुरुवात युगच्या वर्कआऊटला सुरुवात करण्याने होते आणि त्यानंतर त्याने खूप मेहनत घेतल्याचं दिसून येत आहे. ही मेहनत त्याच्या बदललेल्या लूकमध्ये स्पष्ट जाणवते. अजय देवगणच्या मुलाच्या या ट्रान्सफॉर्मेशनने नेटकरी थक्क झाले आहेत. युग आतापासूनच फिटनेसचा शौकीन बनला आहे. नेटकरी त्याच्या मेहनतीचं, फिटनेसचं आणि स्टॅमिनाचं कौतुक करत आहेत. हा व्हिडिओ रॉबिन बहलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

पहा युगचं ट्रान्सफॉर्मेशन-

 

View this post on Instagram

 

A post shared by Robin Behl (@robin_behl14)

रॉबिन बहल हा एक खेळाडू आणि फिटनेसप्रेमी आहे. अजय देवगणच्या मुलाचा व्हिडीओ पोस्ट करत त्याने लिहिलं, ‘या जिममधील सर्वांत जास्त मेहनत करणारा मुलगा. त्याची निष्टा पाहून मला हा प्रवास सुरू ठेवण्याची आणि त्याला त्याच्या सर्वोत्तम शिखरावर पोहोचवण्याची प्रेरणा मिळते. ही तर फक्त सुरुवात आहे.’ रॉबिनच्या या पोस्टवर काजोल आणि तिची बहीण तनिषा मुखर्जीनेही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काजोलने कमेंट बॉक्समध्ये आगीचा इमोजी पोस्ट केला आहे. तर तनिषाने ‘ही मॅन’ असं लिहिलं आहे. ‘भविष्यातील अजय देवगण’ अशाही प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

अजय आणि काजोलचा मुलगा युग सहसा लाइमलाइटपासून दूरच राहतो. त्याला अजय किंवा काजोलसोबत काही कार्यक्रमांमध्ये पाहिलं गेलंय. दुर्गा पूजाच्या वेळी तो आवर्जून आईसोबत उपस्थित असतो. मात्र त्याने चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली आहे. युगने ‘कराटे किड- लेजेंड्स’ या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला आहे, म्हणजेच डबिंग केलं आहे. सध्या तो अभ्यासावरही लक्ष केंद्रीत आहे.





Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Shoaib Akhtar: पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरवर कोसळला दु:खाचा डोंगर; अतिशय जवळील व्यक्तीचे निधन
  • विजय यांच्यावरून त्रिशाची नजरच हटेना; बाराच्या ठोक्याला असा साजरा केला वाढदिवस
  • फुलं घेतली, मिठी मारली, डान्सही केला… तिनेच केतनला खोल दरीत फेकलं ! नवी अपडेट समोर
  • Video : अलका याज्ञिक यांची खालावलेली प्रकृती, पद्मभूषण स्वीकारताना नीट चालताही येईना, व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
  • Maharashtra News LIVE : मुंबईसह राज्यात पावसाचा धुव्वाधार, रस्ते जलमय..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in