• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अखेर बातमी फुटलीच… आमिर खानच्या तिसऱ्या लग्नातील मेन्यू आला समोर, थेट आमिर आणि…

July 3, 2026 by admin Leave a Comment


बॉलिवूड अभिनेता आमिर खान सध्या सोशल मीडियावर त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आहे. आमिर खान वयाच्या 61 व्या वर्षी तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. आपली दीर्घकाळची मैत्रीण आणि प्रेयसी गौरी स्प्रॅट हिच्यासोबत तो 5 जुलै रोजी मुंबईतील स्वतःच्या निवासस्थानी अत्यंत साध्या आणि खासगी समारंभात नोंदणीकृत विवाह करणार असल्याची माहिती स्वतः आमिरने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा विवाह स्पेशल मॅरेज अॅक्टअंतर्गत नोंदविण्यात येणार असून समारंभाला केवळ दोन्ही कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चित्रपटसृष्टीतील मोजके मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विवाहानंतर पाहुण्यांसाठी खास दुपारच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले असून या मेन्यूची निवड आमिर आणि गौरी यांनी स्वतः केली आहे. विवाहसोहळ्यात सुमारे 100 ते 150 पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या खास समारंभात आमिरची मुले आयरा, जुनैद आणि आझाद तसेच गौरीचा मुलगाही उपस्थित राहणार आहे. याशिवाय दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर आणि राजकुमार संतोषी यांच्यासह चित्रपटसृष्टीतील काही जवळचे मित्र उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आमिर खान तिसऱ्यांदा करणार लग्न

अलीकडेच राजकुमार हिराणी यांच्या ‘प्रीतम अँड पेड्रो’च्या प्रीमियर कार्यक्रमात आमिरने आपल्या विवाहाबाबत अधिकृत घोषणा केली. यावेळी तो मुलगा जुनैदसोबत उपस्थित होता. 5 जुलै रोजी आमचा विवाह आहे. आम्ही हा समारंभ अतिशय छोटा आणि खासगी ठेवत आहोत. सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन बॉलिवूड अभिनेता आमिर खानने माध्यमांशी संवाद साधताना केले.

आमिर खानचा हा तिसरा विवाह आहे. यापूर्वी त्याने रीना दत्ता यांच्याशी विवाह केला होता. या विवाहातून त्याला आयरा आणि जुनैद ही दोन मुले आहेत. त्यानंतर त्याने चित्रपट निर्माती किरण राव यांच्याशी विवाह केला असून त्यांना आझाद हा मुलगा आहे. आता गौरी स्प्रॅटसोबत तो आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु होती. अशातच आता दोघेही 5 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs IND : टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणाऱ्या गोलंदाजाला बाहेरचा रस्ता, इंग्लंडचा अजब निर्णय
  • Womens T20 World Cup : वर्ल्ड कप फायनलमध्ये सर्वाधिक वेळा पोहचणारे संघ, ऑस्ट्रेलियाच्या आसपासही कुणी नाही
  • Chanakya Niti : यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका, होईल मोठा घात, चाणक्य काय म्हणतात?
  • Mahesh Bhatt : आलिया भट्टच्या ट्रोलिंगच्या मुद्यावरुन महेश भट्ट प्रत्येक पालकाने एकदा विचार करावं असं बोलले
  • सरकारची गुगल प्ले स्टोअरला नोटीस, ते 7 अ‍ॅप हटवण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in