• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

अंमली पदार्थांच्या समस्येवर संपूर्ण विजय मिळवणे हे सर्व राज्यांचे सामूहिक ध्येय – अमित शाह

June 26, 2026 by admin Leave a Comment


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२६-२९ साठी ‘अमली पदार्थ मुक्त भारता’ करिता एका नव्या कृती आराखड्याचे अनावरण आज दिल्ली येथे आहे. यामध्ये ‘डिटेक्ट, डिसरप्ट आणि डिस्ट्रॉय’ या धोरणाचा अवलंब केला जाईल, ज्याद्वारे पुढील तीन वर्षांत अमली पदार्थांची जाळे समूळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट आहे. ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ नष्ट केले जातील. हा सरकारच्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा एक भाग असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज येथे सांगितले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे नार्को – कोऑर्डिनेशन सेंटरच्या ( एनसीओआरडी ) १० व्या सर्वोच्च स्तरावरील बैठकीचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी “नार्कोटिक्स नियंत्रणावरील व्हिजन डॉक्युमेंट (२०२६-२०२९)” आणि “एनसीबी वार्षिक अहवाल-२०२५” यांचे प्रकाशन यावेळी त्यांनी केले. तसेच जम्मू आणि गुवाहाटी येथील एनसीबीच्या विभागीय कार्यालयांचे ई-उद्घाटन केले. अमित शाह यांनी ‘ऑनलान ड्रग्स डिस्पोजल फोर्टनाइट कॅम्पेन’चा शुभारंभही केला, ज्याचे उद्दिष्ट ६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे २,०९,५०० किलो अमलीपदार्थ नष्ट करणे हे आहे.

सर्व राज्यांचे सामूहिक ध्येय असले पाहिजे

अंमली पदार्थांची समस्या केवळ कायदा आणि सुव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न नाही,तर ती देशाची अंतर्गत सुरक्षा, सामाजिक स्थिरता, आर्थिक हितसंबंध आणि आपल्या तरुण पिढीचे संरक्षण आणि त्यांच्यामार्फत देशाच्या भविष्याशीही संबंधित आहे. या समस्येवर संपूर्ण विजय मिळवणे हे भारतातील सर्व राज्यांचे सामूहिक ध्येय असले पाहिजे असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी संबोधित करताना सांगितले.

अमित शाह पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय निश्चित केले आहे आणि आम्हाला अमली पदार्थमुक्त भारताचे ध्येयही दिले आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी, २०२६ ते २०२९ पर्यंतचा आराखडा Enforcement, Intelligence आणि Operations या चार प्रमुख स्तंभांवर आधारित आहे. पहिला स्तंभ अंमलबजावणी, गुप्तचर आणि कारवाया हा आहे. संपूर्ण नेटवर्कमध्ये लक्षित गुप्तचर-आधारित कारवाया करून ते उद्ध्वस्त करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे.

आपल्या भाषणात केंद्रीय गृह अमित शाह म्हणाले की, ड्रग तस्करी, संघटीत गुन्हेगारी, नार्को टेरर फायनान्स आणि सीमापार अतिरेकी नेटवर्कच्या आर्थिक पोषणासह ही एक समस्या एक Evolving Narco Terrorism Ecosystem देखील बनली आहे. आपल्या देशाची अंतर्गत सुरक्षा, अर्थतंत्र आणि तरुण पिढीच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी आपल्याला या समस्येवर विजय मिळवावा लागेल. आम्ही Death Triangle आणि Death Crescent च्या दरम्यान आहोत. ड्रोन आधारित ड्रॉप्स, समुद्री मार्गांनी कंटेनराईज्ड कार्गो, डार्कनेट, क्रिप्टो पेमेंट, ऑर्डर टू डिलिव्हरी मॉडेल, पार्सलचा उपयोग आदी पद्धतीने ड्रगचा व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या लढाईला आणखीन कठीण केले आहे.

नार्को गुन्हेगार आज तंत्रज्ञान सक्षम आणि नेटवर्कचा वापर करत आहेत आणि मल्टी-डोमेन गुन्ह्यांच्या रूपात आपल्यासमोर उभे आहेत. या कठीण लढ्याला आपला प्रतिसाद देखील सामूहिक आणि संघटित, रोडमॅपवर आधारित आणि आधुनिक आणि बुद्धिमत्ता आघाडीवर आधारित असला पाहिजे. आपला दृष्टिकोन तंत्रज्ञानावर आधारित असला पाहिजे आणि आपल्याला निर्दयी दृष्टिकोन ठेवून नेटवर्क-केंद्रित लढाई लढायची आहे, तरच आपण या समस्येवर विजय मिळवू शकतो असेही अमित शाह यांनी सांगितले.

ड्रग्स व्हीक्टीमच्या प्रति सहानुभूतीपूर्ण भूमिका

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आपण अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात कठोर भूमिका आणि ड्रग्स व्हीक्टीमच्या प्रति सहानुभूतीपूर्ण भूमिका घेतली पाहिजे. ते पुढे म्हणाले की, केवळ आपल्या सद्भावनेनेच या व्हीक्टीम मुलांना पुन्हा सामान्य जीवनात आणता  येईल आणि त्यांना योग्य मार्गावर परत आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असेही ते म्हणाले.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आश्रमशाळेतील 35 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात हलवलं, पालघर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी, अचानक काय घडलं?
  • भारताच्या राफेल आणि स्कॉर्पीन करारामुळे फ्रान्स चमकला! अमेरिका-रशियाला मागे टाकत बनला जगातील सर्वात मोठा शस्त्र विक्रेता
  • अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
  • मोठी बातमी! MPSC कडून घेण्यात आलेली महत्त्वाची परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या आरोपानंतर निर्णय
  • डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी! या देशाने अमेरिकन उत्पादनांवर लादला 20 अब्ज डॉलरचा टॅरिफ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in